Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: महा डिजिटल मिडिया असोसिएशन( MDMA)च्या अध्यक्षपदी आशिष रैच ह्यांची निवड
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
डिजिटल मीडिया पत्रकारांसाठी काम करण्यास कटिबद्ध - आशिष रैच महा डिजिटल मिडिया असोसिएशन( MDMA) या स्वयं नियामक संस्थेच्या चंद्रपूर जिल्हाध्यक्...

  • डिजिटल मीडिया पत्रकारांसाठी काम करण्यास कटिबद्ध - आशिष रैच
महा डिजिटल मिडिया असोसिएशन( MDMA) या स्वयं नियामक संस्थेच्या चंद्रपूर जिल्हाध्यक्षपदी चांदा ब्लास्टचे उपसंपादक आशिष रैच ह्यांची चंद्रपूर जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
वकीलपत्र युट्यूब चॅनेल च्या लाईव्ह कार्यक्रमात संस्थेचे संस्थापक अद्वैत चव्हाण ह्यांनी काल  दिनांक 2/7/ 2021 रोजी रात्री  ठीक नऊ वाजता त्यांच्या नियुक्तीची घोषणा करण्यात आली ह्यावेळी उपस्थित राष्ट्रीय अध्यक्ष दत्ता नाईकनवरे, महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष विनायक शिंदे ह्यांच्या  उपस्थितीत पाच जिल्हाध्यक्ष व एक शहराध्यक्ष पद घोषित करण्यात आले असुन इतर जिल्हाध्यक्षांच्या नावाची घोषणा लवकरच केली जाईल असे घोषित करण्यात आले.
घोषित झालेल्या जिल्हाध्यक्ष पदावर चंद्रपूर जिल्हाध्यक्ष म्हणुन आशिष रैच ह्यांच्या सह सातारा जिल्हाध्यक्ष पदी दादासाहेब चोरमळे, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष पदी सुशांत पवार, खानदेश-जळगाव जिल्हाध्यक्षपदी विठ्ठल पाटील, पुणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष म्हणुन बारामती लाईव्ह चे मुख्य संपादक अमित बगाडे तसेच सोलापूर शहराध्यक्ष डॉक्टर रवींद्र सोरटे अशाप्रकारे सर्वांची निवड अत्यंत पारदर्शक पद्धतीने करण्यात आली आहे.
चंद्रपूर जिल्हाध्यक्ष पदासाठी जिल्ह्यातील डिजिटल मीडिया संपादकांनी माझ्यावर जो विश्वास दाखविला आहे त्या विश्वासाला पात्र ठरून दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पडणार असल्याचे तसेच  डिजिटल मीडिया पत्रकारांच्या हिताचे रक्षण करण्याच्या दृष्टीने महा डिजिटल असोसिएशन (MDMA) माध्यमातून प्रयत्न करून पत्रकार बंधूंना हक्क व न्याय मिळवून देण्याचे काम करणार असल्याचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष आशिष रैच ह्यांनी सांगितले आहे.


Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top