Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: जिल्ह्यात आत्महत्यांच्या घटनेत वाढ युवकाची दुकानात गळफास घेऊन आत्महत्या
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स घुग्घुस - शहरातील तुकडोजी नगर वार्ड क्रमांक ६ मध्ये राहणारे संतोष तुळशीदास चुने वय २७ यांनी आपल्या दुकामध्ये ...
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
घुग्घुस -
शहरातील तुकडोजी नगर वार्ड क्रमांक ६ मध्ये राहणारे संतोष तुळशीदास चुने वय २७ यांनी आपल्या दुकामध्ये पंख्याला गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना उघडीस आली.
दररोज प्रमाणे संतोष हा सकाळी ६.३० वाजताच्या दरम्यान घराबाहेर पडला व चौकात चहा नाश्ता करुन त्याने घुग्घुस-चंद्रपुर मार्गावर असलेली लेडीज़ जनरल स्टोर्स दुकान उघडली मात्र दुकानातच शटर अर्धवट बंद करुन त्याने आतल्या पंख्याला गळफास घेत आत्महत्या केली.
आत्महत्येचं नेमक कारण काय हे अजूनही स्पष्ट कळू शकले नाही. मृतक संतोष यांच्या शेजारी पोलिसांना सुसाइड नोट मिळालेली असून त्यामध्ये आत्महत्येसंबंधी कारणाचा काही उल्लेख आहे काय याचा तपास घुग्घुस पोलिस करीत आहे. मृतकाचे पार्थिव उत्तरीय तपासणीसाठी चंद्रपुर सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. 

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top