Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: राज्यमंत्री ना. बच्चूभाऊ कडू यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर आयोजित
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
वणीत शेकडो युवकांनी केले रक्तदान आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स वणी - महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व ...

  • वणीत शेकडो युवकांनी केले रक्तदान
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
वणी -
महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, कामगार कल्याण राज्यमंत्री तथा पालकमंत्री अकोला जिल्हा ना. बच्चूभाऊ कडू यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिरचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी असंख्य रक्तदात्यांनी रक्तदान केले. तसेच सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी उपस्थीत लावुन कार्यक्रमात मार्गदर्शन केले. याप्रसंगी प्रहार विद्यार्थी संघटना वणीचे शहर संघटक स्व.प्रतिक दादा कठाने यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे अनिकेत चामाटे, साई नालमवार, नितीन गोरे, निखिल बुच्चे, कुणाल पुंज, प्रफुल पंधरे आणी असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

बातम्या अधिक आहेत.....

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top