Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते २३ आदिवासींना जमिनीचे पट्टे वाटप
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
राष्ट्रीय कुटुंब लाभ अंतर्गत मृतकांच्या वारसांना धनादेशाचे वितरण विरेन्द्र पुणेकर - आमचा विदर्भ तालुका प्रतिनिधी राजुरा - राजुरा तालुक्यातील...

  • राष्ट्रीय कुटुंब लाभ अंतर्गत मृतकांच्या वारसांना धनादेशाचे वितरण
विरेन्द्र पुणेकर - आमचा विदर्भ तालुका प्रतिनिधी
राजुरा -
राजुरा तालुक्यातील मौजा सोनापुर-६, घोटा - ११, जामणी-३, बॉम्बेझरी - १,नोकारी खुर्द १, नोकारी बु. १ येथील भुमीहीन आदिवासी बांधवांना आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते वन हक्क कायद्याअंतर्गत जमिनीचे स्थाई पट्टे वाटप करण्यात आले. तसेच राष्ट्रीय कुटुंब लाभ योजने अंतर्गत मृत व्यक्तीच्या वारसांना आर्थिक मदत म्हणून वर्षा संतोष खेकारे, संगीता देवाळकर, कविता आकनूरवार या लाभार्थींना प्रत्येकी २० हजार रुपयांच्या धनादेशाचे वितरण आमदार धोटे यांच्या हस्ते करण्यात आले. 

या प्रसंगी उपविभागीय अधिकारी संपत खलाटे, तहसिलदार हरिष गाडे, संवर्ग विकास अधिकारी डॉ. ओमप्रकाश रामावत, नायब तहसीलदार, लिंगु पाटील, शामराव कोटणाके यासह अनेक मान्यवर आणि लाभार्थी उपस्थित होते.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top