- मात्र कामाची सुरुवात कधी?
- संतप्त नागरिकांनी विचारला सवाल
- सदर कामाकडे अधिकारी-लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष
वनसडी -
कोरपना तालुक्यातील दोन तालुक्याशी जोडणारा वनसडी-पिपर्डा-कारगाव (बु) मार्गाचे खड़ीकरण व मजबुती करणाचे काम मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतुन २०१९-२० मध्ये मंजूर करण्यात आले. ९-१० गावाला जोडणारा हा दुर्गम मार्ग समोर पकडीगुड्डम जलाशयाकडे जातो. या रस्त्याची दुरुस्ती करून डामरीकरण करण्याची मागणी नागरिकांनी केली होती. दोन महिन्यापूर्वी याकामाचे सर्वत्र गाजावाजा करत नारड फोडून थाटात भूमिपूजन संपन्न झाले होते. भूमिपूजनाचा थाट पाहून आता लगेच कामाला सुरुवात होऊन पावसाळ्या आधी काम पूर्ण होईल अश्या आशा पल्लवित झाल्या होत्या मात्र कामाला अजूनही सुरुवात न झाल्याचे पाहता भूमिपूजनाचीच लगीन घाई होती कि काय असा खोचक सवाल नागरिकांनी केला आहे. भूमिपूजन होऊनही न लोकप्रतिनिधी, न संबंधित विभाग, न कंत्राटदार यांनी सदर कामाकडे दुर्लक्ष केल्याची ओरड आता नागरिक करीत आहे.
या मार्गावर खड्याचे साम्राज्य निर्माण झाले असून खड्याचे प्रमाण वाढले आहे. खड्डे असल्याने वाहन चालविणाऱ्या नागरिकांना कमालीची गैरसोय होत आहे. खड्यामुळे अपघाताचे प्रमाण हि वाढले असून पावसाळ्यापूर्वी सदर रस्त्याचे काम पूर्ण न झाल्यास पुन्हा अपघाताचे प्रमाण वाढण्याची शक्यता नागरिकांनी व्यक्त केली आहे. करिता तात्काळ रस्त्याच्या कामाची सुरुवात करण्याची मागणी कारगाव-मरकागोंदी-धनकदेवीयेरगव्हाण येथील नागरिकांनी केली आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.