Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: पैनगंगा नदीतून रेतीचा उपसा करून तेलंगाणामध्ये तस्करी करणाऱ्या तिघांना अटक
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
१२ लाख १८ हजारांचा मुद्देमाल जप्त रक्षक पाटील - आमचा विदर्भ प्रतिनिधी यवतमाळ - झरी तालुक्यातील पैनगंगा नदीतून रेतीचा उपसा करून तेलंगाणामध्ये...

  • १२ लाख १८ हजारांचा मुद्देमाल जप्त
रक्षक पाटील - आमचा विदर्भ प्रतिनिधी
यवतमाळ -

झरी तालुक्यातील पैनगंगा नदीतून रेतीचा उपसा करून तेलंगाणामध्ये तस्करी करणाऱ्या तीन आरोपींना सोमवारी पाटण पोलिसांनी अटक केली आहे. १८ हजारांची रेती व १२ लाखांचे तीन ट्रॅक्टर असा १२ लाख १८ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

रविवारी पहाटे पाटण पोलिस स्टेशनच्या ठाणेदार संगीता हेलांडे यांना पैनगंगेच्या पात्रातून रेतीचा उपसा करून तेलंगाणामध्ये तस्करी केली जात असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर हेलांडे दुर्भा येथील पैनगंगेच्या पात्रात पथकासह पोहचल्या. पात्रातून तीन ट्रॅक्टर रेती भरून तेलंगणमधील आदिलाबाद जिल्ह्यात जात असलेली आढळून आली. पोलिसांनी ट्रॅक्टर थांबवून रेती वाहतुकीचा परवाना व रॉयल्टीबाबत विचारणा केली असता तीनही ट्रॅक्टरचालकांजवळ वाहतुकीचा परवाना किंवा रॉयल्टीचे कागद आढळून आले नाही. त्यामुळे चालक श्यामसुंदर संभाजी जाधव (वय २३), योगेश्वर श्रीरंग जाधव (वय २३) व मनाराजी रामराव मारनूर (वय ३६) तिघेही राहणार जुनी तालुका इचोडा (आदिलाबाद) यांच्यावर भादंविच्या कलम ३७९, १८८ प्रमाणे गुन्हे दाखल करून अटक करण्यात आली. सोबतच तीनही ट्रॅक्टर जप्त करण्यात आले आहेत.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top