Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: नागपूरात रेल्वेस्थानकावर महाराष्ट्र एक्स्प्रेस मधून ब्राउनशुगर जप्त
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आरपीएफची धडक कारवाई आयशा - आमचा विदर्भ प्रतिनिधी नागपूर - दारू आणि गांजासहच आता नागपूरमार्गे ब्राउनशुगरचीही तस्करी होत असल्याचे आढळून आले आह...

  • आरपीएफची धडक कारवाई
आयशा - आमचा विदर्भ प्रतिनिधी
नागपूर -
दारू आणि गांजासहच आता नागपूरमार्गे ब्राउनशुगरचीही तस्करी होत असल्याचे आढळून आले आहे. नागपूर रेल्वे स्थानकावर महाराष्ट्र एक्स्प्रेसमधून ब्राउनशुगर जप्त करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

नागपूर स्थानकावर यापूर्वी गांजा व दारूतस्करीच्या अनेक घटना उजेडात आल्या आहेत. मात्र, अलीकडच्या काही वर्षांत ब्राउनशुगरची तस्करी होत असल्याचे पहिल्यांदाच आढळले आहे. मंगळवारी दुपारी ३.३० च्या सुमारास ०१०३९ महाराष्ट्र एक्स्प्रेस नागपूर स्थानकावर प्लॅटफॉर्म क्रमांक चारवर उभी होती. त्यावेळी आरपीएफचे सहायक उपनिरीक्षक सीताराम जाट व आरक्षक अजय सिंह हे गस्तीवर होते. या गाडीच्या डीएल कोचमध्ये त्यांना बर्थवर एक बॅग बेवारस अवस्थेत दिसली. आजूबाजूच्या प्रवाशांना त्यांनी बॅगविषयी विचारले. मात्र, कोणीच ती आपली असल्याचे सांगितले नाही. त्यामुळे ही बॅग आरपीएफ ठाण्यात आणण्यात आली. तेथे पंचांसमक्ष ती उघडली असता त्यात लालसर रंगाची पावडर आढळून आली. बुधवारी तहसीलदारांच्या उपस्थितीत तज्ज्ञांनी या पावडरची तपासणी केली असता ती ब्राऊन शुगर असल्याचे स्पष्ट झाले. ही ब्राउनशुगर २१.४९ ग्रॅम असून त्याची अंदाजे किंमत २ लाख १४ हजार ९०० रुपये आहे. जप्त केलेला ऐवज लोहमार्ग पोलिसांच्या सुपुर्द करण्यात आला. ही कारवाई वरिष्ठ मंडळ सुरक्षा आयुक्त आशुतोष पांडेय यांच्या मार्गदर्शनात आरपीएफ ठाण्याचे निरीक्षक आर. एल. मीना यांच्या नेतृत्वात करण्यात आली. 







Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top