मूल -
मूल तालुक्यातील भेजगाव येथील एका शेतकऱ्याकडून फेरफार करिता तीन हजार रुपयांची लाच घेताना बेंबाळ सर्कलचे मंडल निरीक्षक महादेव कन्नाके यास लाचलुचपत विभाग चंद्रपूरच्या पथकांनी आज १२ वाजताचे दरम्यान रंगेहात पकडले . भेजगाव येथील शेतकरी आणि सरपंच अखिल गांगरेड्डीवार यांचेकडून फेरफार करिता महादेव कन्नाके यांनी पाच हजार रुपयांची मागणी केली. तीन हजारांमध्ये तडजोड झाली. मात्र अखिल गांगरेड्डीवार यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत विभाग चंद्रपूर यांच्याकडे तक्रार दाखल केली. आज लाचलुचपत विभागाने मूलचे तहसील कार्यालयाजवळ सापळा रचला आणि अखिल गांगरेड्डीवार यांचे कडून तीन हजार रुपये घेताना महादेव कन्नाके यास रंगेहाथ पकडले. महादेव कन्नाके यांच्याबद्दल अनेक तक्रारी असून सामान्य शेतकऱ्यांना ते वारंवार त्रास देत असल्याच्याही तक्रारी आहेत सरपंच यासारख्या व्यक्तीकडून लाच घेण्याची हिंमत त्यांनी केली मात्र ते अलगद जाळ्यात पकडल्याने, अनेकांनी आनंद व्यक्त केला आहे. पुढील कारवाई पोलिस करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.