Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: दुसरी लाट परतीच्या मार्गावर, पण सावधता बाळगणे आवश्यक
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
24 तासात 1160 झाले कोरोनामुक्त 370 कोरोना बाधित रुग्णांची नव्याने भर ; 26 बाधितांचा मृत्यू बरे झालेल्यांची संख्या 68 हजार 835 सध्या 8 हजार 3...

  • 24 तासात 1160 झाले कोरोनामुक्त
  • 370 कोरोना बाधित रुग्णांची नव्याने भर ; 26 बाधितांचा मृत्यू
  • बरे झालेल्यांची संख्या 68 हजार 835
  • सध्या 8 हजार 373 बाधितांवर उपचार सुरू
  • चंद्रपूर जिल्हा कोरोना अपडेट - वाचा सविस्तर......

आमचा विदर्भ - श्रावण कुमार प्रतिनिधी
चंद्रपूर -
दि. 18 मे : जिल्ह्यात मागील 24 तासात 1160 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 370 कोरोना बाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून 26 बाधीतांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 78 हजार 509 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 68 हजार 835 झाली आहे. सध्या 8 हजार 373 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 4 लाख 39 हजार 35 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 3 लाख 57 हजार 584 नमुने निगेटीव्ह आले आहेत.

आज मृत झालेल्यामध्ये चंद्रपूर शहरातील अंचलेश्वर वार्ड येथील 70 वर्षीय पुरुष, नेहरू नगर येथील 62 वर्षीय पुरुष, सिव्हिल लाईन परिसरातील 65 वर्षीय पुरुष, पडोली येथील 45 वर्षीय पुरुष,तुकूम परिसरातील 56 वर्षीय महिला, नगीनाबाग येथील 69 वर्षीय महिला, 49 वर्षीय महिला. देवाडा येथील 70 वर्षीय पुरुष, कोकेवाडा येथील 43 वर्षीय पुरुष. किटाळी-शिदूर येथील 61 वर्षीय महिला, पांढरकवडा येथील 42 वर्षीय महिला.

बल्लारपूर तालुक्यातील 82 वर्षीय महिला, विसापूर येथील 52 वर्षीय महिला. राजुरा तालुक्यातील 55 व 65 वर्षीय महिला. मूल तालुक्यातील 68 व 76 वर्षीय पुरुष.

भद्रावती तालुक्यातील 68 व 75 वर्षीय पुरुष. गोंडपिपरी तालुक्यातील 37 वर्षीय पुरुष. कोरपना तालुक्यातील 23 वर्षीय पुरुष. चिमूर तालुक्यातील 60 वर्षीय महिला, अडेगाव येथील 60 वर्षीय महिला. नागभीड तालुक्यातील 60 वर्षीय महिला तर वणी येथील 61 वर्षीय पुरुष व 70 वर्षीय महिलेचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 1301 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 1204 , तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 35, यवतमाळ 44, भंडारा 11, वर्धा एक, गोंदिया दोन आणि नागपूर येथील दोन बाधिताचा समावेश आहे.

आज बाधीत आलेल्या 370 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 127, चंद्रपूर तालुका 33, बल्लारपूर 27, भद्रावती 06, ब्रम्हपुरी 16, नागभिड 19, सिंदेवाही 12, मूल 25, सावली 16, पोंभूर्णा 07, गोंडपिपरी 19, राजूरा 16, चिमूर 03, वरोरा 21, कोरपना 15, जिवती 03 व इतर ठिकाणच्या 05 रुग्णांचा समावेश आहे.

नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच 45 वर्षावरील सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top