- महावितरणच्या गलथान कारभार
- आता गोवरी गावच्या सरपंच आशाताई उरकुडे ही भडकल्या
- वारंवार विद्युत खंडित आणि पांदन रस्त्यासंबंधी प्रशासनाला शेवटचे निवेदन
- तोडगा न निघाल्यास उपकार्यकारी अभियंत्याच्या कॅबिन मध्ये घूसूनच घेराव करू - बबन उरकुडे
- शिवसेना माजी उपजिल्हा प्रमुख बबन उरकुडे यांचा प्रशासनाला खणखणीत इशारा - बघा व्हिडीओ
![]() |
प्रशासनाला निवेदन देतांना शिवसेना माजी उपजिल्हा प्रमुख बबनभाऊ उरकुडे, गोवरी गावच्या सरपंच आशाताई उरकुडे व गावातील संतापलेल्या महिला व नागरिक |
अनिल गंपावार - आमचा विदर्भ तालुका प्रतिनिधी
राजुरा -
राजुरा तालुक्यातील मोठ्या ग्रामपंचायती पैकी एक असलेल्या गोवरी गावात मागील दोन महिन्यापासून सतत वीज पुरवठा खंडित होत आहे. प्रत्येक दिवशी दिवसातून शंभरदा खंडित होत असलेल्या विजपूरवठ्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे गावाला पाणी पुरवठा करण्यासाठी ग्राम पंचायतीची पाण्याची टॅंक भरत नसल्यामुळे गावात पाणीपुरवठा होत नसून आता नागरिक त्यामुळे हि त्रस्त झाले आहे. भर उन्हात गावातील नागरिकांना पाण्यासाठी वणवण फिरत पाहता आता गावातील सरपंच आशाताई उरकुडे ह्यासुद्धा महावितरणच्या गलथान कारभारा मुळे भडकल्या. कोरोना नियम लागू असतांना सुद्धा आज भर उन्हात सरपंच आशाताई उरकुडे, शिवसेना माजी उपजिल्हा प्रमुख बबन उरकुडे हे शेकडो महिलांसोबत महावितरण कार्यालयात धडकले व शेवटचे विनंतीवजा निवेदन महावितरण कार्यालयाला तसेच तहसीलदारांना सादर केले. यावेळी उरकुडे दाम्पत्यांनी महावितरणने भोंगळ कारभार त्वरित बंद करून वीज पुरवठा अखंडित ठेवण्यासाठी प्रयत्न करावा व विद्युत पुरवठा सुरळीत करावा अन्यथा कोणतेही नियम न पाळता महावितरण कार्यालयाला घेराव अंदोलन करून उपकार्यकारी अभियंत्याच्या कॅबिन मध्ये घूसूनच घेराव करू असा खणखणीत इशारा बबन उरकुडे यांनी दिला. तद्वतच महावितरणचे कनिष्ठ अभियंता यांनी निवेदन घेत विजेच्या समस्या तात्काळ सोडवण्याचे आश्वासन दिले.
शिवसेना माजी उपजिल्हा प्रमुख बबन उरकुडे यांचा प्रशासनाला खणखणीत इशारा बघा व्हिडीओ
याचप्रमाणे मागच्यावेळेस गोवरी गावातील शेतकऱ्यांना शेतशिवारात जाण्याकरिता पांदन रस्त्या संबंधी तहसीलदारांना निवेदन देऊनही त्यांनी त्यासंबंधी आदेश काढला नाही. त्याच संदर्भात आज पुन्हा एकदा शेतशिवारात जाण्याकरिता पांदन रस्त्या तयार करून देण्याच्या मागणीचे पुनःश्च निवेदन देऊन पुन्हा लक्ष वेधण्यात आले. तसेच पांदन रस्त्यासंबंधी राजुराचे नगराध्यक्ष अरुणभाऊ धोटे यांच्या मध्यस्थीने त्वरित रस्ता साफ करून मुरूम टाकण्याचे लेखी आदेश काढणार असल्याचे तहसीलदार यांनी सांगितले. याप्रसंगी भर उन्हात गोवरी येथील असंख्य महिलांसोबत नागरिकही उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.