- राजकीय वरदहस्त असणाऱ्यांवर प्रशासनाचा कार्यवाहीस टाळाटाळ
- लावलेली सीसीटीव्ही यंत्रणा गायब ; ऑनलाईन इन्व्हाईस प्रक्रियाही नाही
- तालुक्यातील रेती घाटधारकांवर कोणाचा आशीर्वाद?
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी गडचांदूर -
चंद्रपूर जिल्ह्यातील अतिसंवेदनशिल अशी कोरपना तालुक्याची ओळख आहे. त्यातच औद्योगिक दृष्टिने भरभरा टीस येत असलेल्या कोरपना तालुक्यात अवैध रेती तस्करीचा बेभान सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे. असाच काहीसा प्रकार कोळशी घाटावर असून येथे रेतीचे अवैध उत्खनन सुरू असून हजारो रेतीचा उपसा करून कोणताही शासनाचा पुरावा नसताना साठा करून परस्पर विकत असल्याचे निदर्शनास आले असून महसूल विभागाचे अधिकारी यांचा आशिर्वादाने हा एवढा मोठ्या प्रमाणावर गोरख धंदा सुरू असल्याचे समजते.
कोळशी येथील घाटधारक अवैध वाळूचा उपसा करून परस्पर विना खनिज परवाना बेकायदा वाळू विक्री करीत असल्याची कोरपना परिसरातील जनमानसात मोठ्या प्रमाणात चर्चा आहे कोरपना तालुका महसूल प्रशासनाचे अवैध वाळू तस्करांना सहकार्य असल्यानेच सर्व धंदा सुरू असल्याचे बोलले जात आहे.
विना खनिज परवाना वाळूची परस्पर विक्री
कोळशी येथील घाटधारकाने नदीपात्रातून हजारो ब्रास वाळू अवैधपणे उत्खनन करून त्याचा साठा करून विना खनिज परवाना वाळूची परस्पर विक्री करित असल्याचे निदर्शास आले.
नदी घाटावर सीसीटीव्ही यंत्रणा गायब
घाट धारकाला घाटाची आवंटन केल्यावर महसुली कर्मचार्यांकडून आवाहनही केलेल्या गटाचे मोजमाप करुन लेआऊट आखणी करून देतात नदी घाटावर सीसीटीव्ही यंत्रणा लागल्यावरच रेती उत्खनन करावे असे शासनाचे दिशानिर्देश असतांनाही कोळशी येथील नदीघाटावर सीसीटीव्ही यंत्रणाा गायब असल्याचे दिसून आले.
ऑनलाईन इनव्हाईस पध्दतीचा अवलंब नाही
हजारो ब्रास वाळूची तस्करी करण्याच्या उद्देशाने घाटधारकाकडून संगणकीकृत ऑनलाईन इनव्हाईस पध्दतीचा वापर केलेला नाही संगणीकृत ऑनलाईन इनव्हाईस पध्दतीचा वापर होत नसत नाही अवैध रेती उत्खनन व विक्री सुरू असल्याने यावर प्रश्न निर्माण होत आहे.
महसूल कर्मचारी देखरेख नाही
घाट धारकाकडून वाळूची चोरी होऊ नये याकरिता २४ तास देखरेख ठेवता यावी महसुली म्हणुन कर्मचाऱ्यांची नेमणूक करणे महसुली अधिकाऱ्याचे कर्तव्य आहेत परंतु खेदाची बाब अशी की आपण या घाटावर अवैध वाळू तस्करी रोखण्याकरिता व देखरेख नियंत्रण ठेवण्याकरिता कोणाचीही नेमणूक केली नाहीत.
गट क्रमांक बाहेर वाट्टेल तिथे उत्खनन
स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीच्या आधारे घाटधारकाला अलाट केलेल्या गट क्रमांकाचे बाहेर वाटेल तिथे घाटधारकाने उत्खनन केले असल्याचे समजते तसेच घाटावर जाऊन पाहणी केली असता जिथे मर्जीने वाट्टेल तिथे उत्खनन केल्याचे दिसते महसुल विभागाने कुठे लेआउट दिलेला आहेत याचा बोध उत्खननाच्या ठिकाणी पाहणी केल्यावर होत नाही
रायल्टीवर सविस्तर माहिती नाही
खनिज परवाना देतांना गाडी कुठे आणि कुणाकडे जात आहे अशी सविस्तर माहिती लिहल्या जाते. परंतू या ठिकाणी फक्त गाडी मालकाचे नाव व नंबर टाकून दिसला गौण खनिज कोणत्या ठिकाणी कुठल्या गावाला दिले गेले आहे याबाबत ठिकाणाचा पत्ता न टाकताच रायल्टी देण्यात येत असल्याचे दिसून आले.
अनेक ट्रॅक्टर वर परवाना क्रमांक नाही
कोणतेही वाहन असो त्याला परवाना व नंबर असणे जरुरी असते अन्यथा रीतसर कारवाई करून दंड ठोठावण्यात येते. परंतू नदी घाटावरील रेती उत्खनन करून भरून नेणाऱ्या 90 टक्के ट्रॅक्टर व ट्रॉली वर त्यांचे परवाना क्रमांक लिहीलेले नव्हते. तसेच अनेक ट्रॅक्टर हे कृषी विभाग योजने अंतर्गत दिलेले असून ते अवैध रेती वाहतुकी करिता त्याचा उपयोग केल्या जात असल्याचे निदर्शनास येत आहे.
शासनाचे नियमांचे उल्लंघन
कोळशी येथील घाट धारकाकडून वाळू उत्खनना संबंधाने शासनाचे व उच्च न्यायालयाच्या दिशानिर्देशांचे व नियमांचे उल्लंघन केेले जात असून कायदेेशिर चा नावावर बेकायदेशीर धंदा सुरू आहे. यात इतर ठीकणी उत्खनन केल्या जात असल्याने नैसर्गिक हानी होत असून करोडो रुपयाचे शासनाचा महसूल बुडत असल्याचे दिसून येत आहे.
राजकिय वरदहस्त कारवाईस टाळाटाळ
घाट धारकला जिल्हातील बड्या नेत्याचे राजकीय पाठबळ असल्याने कोरोडो रुपयांची अवैध रेती विना खनिज परवाना परस्पर विक्री करीत आहे. परंतू यावर थातुर मातुर कारवाही सोडली ते इतर मोठी कारवाही करण्यास अधिकारी पुढे सरसावत नसल्याचे दिसून येत आहे. राजकिय वरदहस्त असल्याने अधिकारी सुध्दा कारवाही करण्यास टाळाटाळ करीत आहे.
एवढया मोठया प्रमाणावर नियमबाह्य उत्खनन व अवैध रेती वाहतूक केल्या जात आहे मात्र याची चाहूल तहसिलदार साहेब यांना नाही का..? की त्याचेच पांढरे हात काळे केल्याने हा सगळा घोरख धंदा त्यांचा आशिर्वादाने सुरू तर नाही ना अशी शक्यता बळावली जात आहे.
या प्रकरणाची प्रतिक्रिया घेण्यास काही प्रतिनिधी महसूल विभागात गेले असता त्यांना उडवा उडविची उत्तरे देतात. आम्हाला घाट लिलावाची फाईल बघाव लागले. तुम्ही आम्हाला नियम सांगायचे नाही जिल्हाधिकारी साहेबांना जाऊन सांगा. तुम्हाला वाटत असेल तर माझी तक्रार करा. सर्व नियमांनी सुरू आहे असे उर्मटपणाचे संभाषणही येथील अधिकारी करतात.
घाटधारक शासन नियम व उच्च न्यायालयाच्या दिशा निर्देशांचे उल्लंघन करीत आहे. कोरपना तालुक्यात मोठ्याप्रमाणात रेती तस्करी सुरु आहेत. जिल्ह्यातील एका मोठ्या नेत्याचा वरदहस्त व घाटधारकाकडून मिळणारी रक्कम मोठी असल्याने महसुली अधिकारी नाममात्र थातुरमातुर कारवाई करताहेत लवकरच जिल्हाधिकारी यांचेकडे तक्रार करुन तालुका प्रशासनाशी संगनमत करुन होणार्या रेती तस्करीचा पर्दापाश करणार आहेत.
शैलेश लोखंडे, तक्रारकर्ता, गडचांदूर
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.