- मात्र महिला संतापल्या......
- वाचा सविस्तर.....
चंद्रपूर -
जिल्ह्यातील दारूबंदी हटविण्याची मागणी सातत्याने होत होती. जिल्ह्यांमध्ये दारूबंदी असली तरी योग्यप्रकारे अंमलबजावणी होत नसल्याने अवैध दारूविक्री वाढली असून ती हटविली पाहिजे अशी मागणी जिल्ह्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून सुरु झाली होती.
दारूबंदी करूनही मात्र त्याची अंमलबजावणी योग्य पद्धतीने होत नसल्यामुळे जिल्ह्यात अवैध दारु विक्रीचा सुळसुळाट झाला होता. तर दुसरीकडे दारूबंदीसाठी महिलांचे मोठे आंदोलन हि झाले होते. मात्र महिलांच्या विरोधाला झुगारून आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट बैठकीत दारूबंदी उठविल्याची माहिती मदत व पुनर्वसनमंत्री तसेच चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी पत्रकार परिषदेत दिली.
दारूबंदी उठविल्यामुळे पोलिस व महसूल विभागातील हप्ताखोरीला आळा बसेल आणि महसुलात वाढ होईल.तसेच लोकप्रतिनिधीची दुकानदारी चालू होईल. यामुळे महिला हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ होईल.एवढे मात्र निश्चित आहे.
उत्तर द्याहटवा