Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: ग्रापं दुर्गापूरात सांडपाणी नागरी वस्तीत
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
वॉर्ड क्रमांक ३ च्या ग्रापं सदस्याविरुद्ध नागरिकांचा आक्रोश ग्रापं सदस्याच्या उलट्या बोंब्या म्हणे, ६ महिने आमच्या घरी पाय ठेवू नका श्रावण क...

  • वॉर्ड क्रमांक ३ च्या ग्रापं सदस्याविरुद्ध नागरिकांचा आक्रोश
  • ग्रापं सदस्याच्या उलट्या बोंब्या म्हणे, ६ महिने आमच्या घरी पाय ठेवू नका
श्रावण कुमार - आमचा विदर्भ प्रतिनिधी
चंद्रपूर -
ग्राम पंचायत दुर्गापूरच्या हद्दीतील सार्वजनिक शौचालयाची नाली चोकअप झाल्यामुळे संडासाचे घाण पाणी दुर्गापूर वार्ड क्र ०३ च्या रस्त्याने मागील ४ ते ५ दिवसापासून वाहत असल्याने नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. यामुळे आजूबाजूच्या परिसरात दुर्गंधीचे वातावरण पसरत असून नागरिक या उग्र वासामुळे हैराण झाले आहेत. वार्डातील नागरिक आपली व्यथा स्थानिक ग्राम पंचायत सदस्याला सांगण्यासाठी गेले असता तुम्ही पुढचे ६ महिने आमच्या घरी पाय ठेवू नका असे अपमानजनक बोलून वापस पाठविले अशी माहिती वॉर्डातील संतप्त महिलांनी दिली. सध्या तक्रारकर्त्या या महिलेचे व्हिडीओ सोशल मीडिया वर वायरल होत असून निवडणुकीच्या वेळी मोठे मोठे आश्वासन देणाऱ्या लोकप्रतिनिधींचा खरा चेहरा मात्र आता समोर आला आहे. सदर बाबीची माहिती शिवसेना शाखा दुर्गापूर ला माहिती होताच शिवसेना उप तालुका प्रमुख नागेश कडुकर यांच्या नेतृत्वाखाली वार्डातील नागरिकांनी आपला रोष व्यक्त करून दुर्गापूर वार्ड क्र ०३ च्या ग्राम पंचायत सदस्यांनी आपला त्वरित राजीनामा द्यावा अशी मागणी केली. यावेळी वॉर्ड नं. २ चे ग्रापं सदस्य सारंग वाकोडे, माजी ग्रापं सदस्या सपनाताई गणवीर, मुकेश हुमने, महेश निब्रड, अवि धवन, निरुपला दहिवले, मिलिंद मेश्राम, चेतन कामतवार, तोसिफ खान, शार्दूल गणवीर इत्यादी नागरिक उपस्थित होते. 
संतप्त महिलांचा आक्रोश - बघा व्हिडीओ

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top