Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: कोरोना लसिकरण जागृतीसाठी कवी संमेलनाचे आयोजन
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
फिनिक्स साहित्य मंचाचा पुढाकार शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी चंद्रपूर - सध्या कोरोना महामारीने थैमान घातले आहे. व्यापक प्रमाणात जनजागृती...

  • फिनिक्स साहित्य मंचाचा पुढाकार

शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
चंद्रपूर -
सध्या कोरोना महामारीने थैमान घातले आहे. व्यापक प्रमाणात जनजागृती गरजेची आहे. महाराष्ट्र शासन कोरोना आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी विविध उपाययोजना आखत असून विविध शासन निर्णयानुसार सर्व नागरिकांसाठी कोरोना लसिकरण मोहिम हाती घेतली आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नागरिकांनी लसिकरण करावे, यासाठी चंद्रपूरातील फिनिक्स साहित्य मंचाने जनजागृतीसाठी पुढाकार घेत आभासी कविसंमेलनाचे आयोजन केले आहे.

शासनाची महत्वपूर्ण मोहिम अधिक प्रभावी राबविल्या जावी, लोकांमध्ये मोहिमेची विशेष जनजागृत्ती व्हावी, या उद्देशाने मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डीले यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्यातील कवी, लेखकांच्या लेखनातून या मोहीमेचा विशेष प्रचार व प्रसार व्हावा, या हेतूने २० मे रोजी ऑनलाईन कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. फिनिक्स साहित्य मंचातर्फे आयोजित 'संदेश कोरोना लसिकरणाचा' या विषयावर कविसंमेलन प्रसिद्ध युवा कवी व माह्यी परदेश वारीचे लेखक गोपाल शिरपूरकर यांच्या अध्यक्षतेत होईल. सुत्रसंचालन कवी नरेशकुमार बोरीकर तर आभार कवी सुरेंद्र इंगळे करतील. कवीसंमेलनात सहभागी होण्याचे आवाहन गोंडपिपरीचे सहा. गटविकास अधिकारी तथा कवी संमेलनाचे आयोजक धनंजय साळवे, कवी विजय वाटेकर, कवी धर्मेंद्र कन्नाके यांनी केले आहे. कविसंमेलनात सहभागी कविंच्या रचना शासन स्तरावर जनजागृतीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डीले यांना फिनिक्स साहित्य मंचातर्फे सुपुर्द करण्यात येतील असे कळविण्यात आले आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top