म्युकरमायकोसिसने मृत्यूमुखी पडलेल्या या महिलेचे नाव ज्योती देशपांडे असून त्या ६३ वर्षांच्या होत्या. पालकमंत्री अँड. यशोमती ठाकुर यांनी जिल्ह्यात कोरोनाची तिसऱ्या लाटेची शंका व्यक्त केली होती. ग्रामीण भागातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येमुळे प्रचंड धास्ती निर्माण झाली आहे. अशात शनिवारी शहरातील साई नगर परिसरातील ज्योती देशपांडे (६३) यांचा कोरोना बरा झाल्यानंतर त्या घरी परतल्या. काही दिवसांनंतर पुन्हा अस्वथ वाटू लागण्याने त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेतला. त्यात त्यांना म्युकरमायकोसिसची लागण झाल्याचे निदान करण्यात आले होते. शहरातील एका खासगी रुग्णालयात देशपांडे यांच्यावर उपचार सुरु होते. दरम्यान शनिवारी त्यांचा उपचारादरम्यान म्युकरमायकोसिसमुळे मृत्यू झाल्याच्या माहिती सर्वसामान्य नागरीकांची चिंता वाढली आहे.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या शक्यतेमुळे चिंता वाढली असतानाच म्युकरमायकोसिसचा पहिला बळी गेल्यामुळे अमरावती जिल्हात प्रचंड खळबळ माजली आहे. राज्यभरात वेगाने हातपाय पसरत असलेल्या म्युकरमायकोसिस या बुरशीजन्य रोगाने आता अमरावती जिल्ह्यातही शिरकाव केला आहे.
म्युकरमायकोसिसचे ही पोस्ट कोव्हिड कॉम्प्लिकेशन आहे. त्यामुळे रुग्णांची फुप्फुसांची क्षमता वाढवण्यासाठी टीबी रुग्णालय परिसरात पुनर्वसन केंद्र सुरु केले असून, त्या ठिकाणी रुग्णांना व्यायाम, योगा शिकवले जात असून सकारात्क उर्जे सेाबतच रुग्णांची रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यावर भर देण्यात येत असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले यांनी दिली होती.
कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी अमरावती जिल्हा प्रशासनाने सात दिवस संपूर्ण लॉकडाऊनची घोषणा केली होती. दरम्यान पुन्हा १६ ते २२ मे पर्यंत पुन्हा टाळेबंदी वाढविण्यात आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.