- ब्रेक द चैन चा फज्जा - नाश्त्याच्या हातगाडीवर तोबा गर्दी
- मनपा पथकाचा कानाडोळा
- हातगाडीजवळ खर्रे विक्रीही जोमात
- कोरोना वाढला तर मग दोष प्रशासनालाच का?
चंद्रपूर -
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात एक जून पर्यंत ब्रेक द चैन अंतर्गत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे. राज्यातील सर्वच बाजारपेठा बंद करण्यात आल्या आहेत. जीवनावश्यक वस्तूं करिता सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत खरेदीसाठी सूट देण्यात आली आहे. हॉटेल्सना फक्त पार्सल करिता मुभा देण्यात आली आहे. पण चंद्रपूर मनपा पथकाच्या कानाडोळ्यामुळे रस्त्याच्या कडेला लागणाऱ्या नाश्त्याचा हातगाडीवर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या भयावह लाटेतही ग्राहकांची गर्दी उसळत आहे. विशेष म्हणजे हॉटेल्सना फक्त पार्सल करिता मुभा देण्यात आली आहे पण हातगाडीवर चक्क नास्ता करतांना, एकाच गिलासातुन पाणी पितांना कोरोना नियमांचा फज्जा उडत नाही आहे का? हातगाडीवर जवळच मोटारसायकल वर बसून खर्रे विक्रीही जोमात सुरु आहे. नास्ता झाल्यावर लोक तिथूनच खर्रे घेऊन खात आहे. विशेष म्हणजे मनपा ने जिथे "सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका" असं जनजागृती करिता मोठं बॅनर लावलं आहे त्याचा खालीच मोटारसायकलवर खर्रे विक्री होत आहे. यावरून चंद्रपूरकर आरोग्य आणि स्वच्छते बद्दल किती जागरूक आहेत याची प्रचिती होते. मनपाच्या कानाडोळ्याने व आपल्या अश्या गलथान वागण्याने कोरोना वाढला तर मग प्रशासनाला दोष का?
![]() |
| "नाही ठेऊ आम्ही चंद्रपूर स्वच्छ, कितीही लावा बॅनर तुम्ही मस्त......" खर्रे विक्रेते असे तर म्हणत नसेल ना? |
जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत आहे. मृत्यूचा आकडाही वाढत आहे. असे असताना नाश्त्याच्या हातगाडीवर होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण आणणे मनपा पथकाला जमलेले दिसत नाही. कोरोनाची दुसरी लाट धोकादायक स्थितीत असताना नाश्त्याच्या हातगाडीवर गर्दी होत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. जयंत टॉकीज परिसर, श्री टॉकीज चौक परिसर येथील नाश्त्याच्या हातगाडीवर तोबा गर्दीने परिसरातील नागरिकांनी भीती व्यक्त केली आहे. एकीकडे प्रशासन व्यापाऱ्यांचे दुकान सील करून जबर दंड आकारत आहे तर दुसरी कडे अश्या लोकांना नियमात सूट देत आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे. जिल्हाधिकारींनी याकडे लक्ष देण्याची मागणी सुज्ञ नागरिकांनी केली आहे.


टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.