Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: व्हाट्सएप समूहाच्या माध्यमातून जुळले 425 विवाह
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
'बेलदार वधू-वर सूचक समूह' चा स्तुत्य उपक्रम कोरोना काळातही जोडले 200 विवाह आमचा विदर्भ - प्रेम नरडलवार झरी जामनी - व्हाट्सउप गृप च्य...

  • 'बेलदार वधू-वर सूचक समूह' चा स्तुत्य उपक्रम
  • कोरोना काळातही जोडले 200 विवाह
आमचा विदर्भ - प्रेम नरडलवार
झरी जामनी -
व्हाट्सउप गृप च्या माध्यमातून बेलदार सामाजातील युवा वर्गानी 425 विवाह जोडली आहे. विशेष म्हणजे यातील 200 विवाह हे लॉकडाऊन काळातील आहे.  यामुळे वेळ पैसा व श्रम वाचले आहे आज तरुण पिढी पासून तर वृद्धा पर्यंत सर्वांजवळच स्मार्टफोन असला तरी त्या स्मार्टफोनच्या वापरातून स्मार्ट कार्य होण्याचे प्रमाण कमीच आहे. सध्याचे युगात प्रत्येक जण व्हाट्सअप वर आला आहे. प्रत्येकाचे व्हाट्सअप ग्रुप बनलाय या ग्रुपवर वेगवेगळ्या विषयांची चर्चा होताना दिसते व्हाट्सअप सारख्या सामाजिक माध्यमांचा वापर केवळ विरंगुळा म्हणूनच समूहावर संदेश पाठवतात तर काहीजण समाजिक कार्य केलेला संदेश पाठवतात मात्र याच व्हाट्सअप माध्यमाचा सामाजिक कार्यासाठी वापर करून गजानन चंदावार, राकेश बारशेट्टीवार रा.वणी, दीपक आईनदलवार चंद्रपूर, स्नेहा गोरलावार रा.मूल, शिल्पा काशेट्टीवार व माही सेपुरवार रा.राजुरा या तरुण-तरुणींच्या संकल्पनेतून सामाजिक बांधिलकी म्हणून विवाह जुळण्यासाठी 'बेलदार वधु वर सूचक' नावाचा समूह जून 2017 ला बनवला आतापर्यंत या समूहाद्वारे 425 लग्न जुळलेले आहे. तर कोरोना काळामध्ये 200 च्या जवळपास लग्न जुळलेले आहे.

व्हाट्सअप समूहाच्या माध्यमातून गोरगरीब पालकवर्गांना मुला-मुलीचे विवाह जुळण्यास लागतो आहे हातभार
सुरुवातीला या समूहावर दर शनिवार रविवार असे महिन्यातून चार वेळा मुला मुलींचे बायोडाटा टाकल्या जात होते. बायोडाटा वाढत गेल्यानंतर महिन्यातून दोन वेळा आणि आता महिन्यातून एकदाच मुला मुलींचे बायोडाटा टाकल्या जातात 'बेलदार समाज वधु वर सुचक' च्या पाच समूहाद्वारे 1285 सदस्यांचा समावेश आहेत तर काही सदस्य प्रतीक्षा समूहामध्ये आहे या समुहाची व्याप्ती ही महाराष्ट्रापुरतीच नसून गुजरात, छत्तीसगड, तेलंगाना, अमेरिका, आफ्रिका येथील तरुण-तरुणींनी आपला बायोडाटा या समूहावर पाठवला आहे.

आज कोरोना काळात आपल्या मुला-मुलींचे लग्न कसे जुळणार हा यक्षप्रश्न आई-वडिलांना व पालकांना सध्या सातत्याने सतावत आहे मात्र या सगळ्या बाबींवर समर्थ पर्याय व विवाह इच्छुक मुला मुलींसाठी एक आशेचा किरण म्हणून म्हणून 'बेलदार उपवर-वधू समूहा' कडे पाहिल्या जात आहे. केवळ व्हाट्सअप च्या माध्यमातून विवाह जुळवून गजानन चंदावार, दीपक आईंदलवार, राकेश बारशेट्टीवार, स्नेहा गोरलावार, शिल्पा काशेट्टीवार यांनी आपले सामाजिक दायित्व जोपासले आहे. या समूहाच्या माध्यमातून अत्यंत मोलाचे सामाजिक कार्य जून 2017 पासून आज पर्यंत अविरत सुरू आहे. या समूहामुळे कोरोना काळात समाजातील गोरगरीब मुलामुलींचे विवाह जुळण्यास मोलाची मदत झाली व त्यांची आर्थिक बचत सुद्धा झाली आहे. 








Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top