Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: कोल इंडियाच्या अकराव्या वेजबोर्ड साठी बीएमएसचा इशारा
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
1 जून पर्यंत निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलन - महामंत्री सुधीर घुरडे अनिल गंपावार - आमचा विदर्भ तालुका प्रतिनिधी राजुरा - कोल इंडिया कामगारांच...

  • 1 जून पर्यंत निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलन - महामंत्री सुधीर घुरडे
अनिल गंपावार - आमचा विदर्भ तालुका प्रतिनिधी
राजुरा -
कोल इंडिया कामगारांच्या पाच वर्षीय नवीन वेजबोर्डची तारीख जवळ आली असताना आणि केंद्रीय कोळसा मंत्रालयाने मंजुरी दिल्यावरही व्यवस्थापनाने अद्यापही कोल वेज बोर्डची बैठक बोलाविली नाही. ही बैठक तातडीने दिनांक 1 जून 2021 पर्यंत बोलवावी अशी मागणी अखिल भारतीय कोयला खदान मजदूर संघाचे केंद्रीय महामंत्री सुधीर घुरडे यांनी कोल इंडियाचे अध्यक्षाकडे केली आहे. अन्यथा संपूर्ण कोल इंडियातील कोळसा खाणीत तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

दर पाच वर्षाला कोळसा खाण कामगारांची नव्याने वेतन निश्चित करणारा वेज बोर्डची स्थापना होऊन नवी वेतनश्रेणी लागू होत असते. अनेकदा कोल इंडिया वेज बोर्ड साठी उशीर करीत असल्याने विविध लाभापासून कामगार वंचित राहतात. यावेळी असे होऊ नये आणि कामगारांना न्याय मिळावा, म्हणुन भारतीय कोयला खदान मजदूर संघाने आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. येथील कामगार अत्यंत श्रम करून कोळशाचे उत्पादन करून देशातील ऊर्जेची गरज भागवितात. यावेळी कोरोना काळातही कामगारांनी सतत कार्य करून कोळशाची कमतरता जाणवू दिली नाही. यामुळे कामगारांना वेळेवर नवीन अकरावा वेज बोर्ड लागु करणे गरजेचे आहे. केंद्रीय कोल मंत्रालयाने याबाबत कोल इंडियाला हिरवी झेंडी दिली आहे. या वेज बोर्डची जेबीसीसीआय या संचालन समितीची तातडीने बैठक बोलवणे गरजेचे आहे. मात्र कोल इंडियाने अद्याप याबाबत पाउले उचलली नाहीत.

आता 1 जून 2021  पर्यंत जेबीसीसीआई ची बैठक बोलाविली नाही तर 2, 3 व 4 जून ला द्वारसभा 5, 6 व 7 जून ला मुख्य महाव्यवस्थापक कार्यालयावर धरणे आंदोलन आणि 10 जून ला कोल इंडिया च्या सर्व कंपनी मुख्यालयावर विशाल धरणे आंदोलन करण्यात येईल. यावेळी औद्योगिक शांती भंग झाली तर त्याची जबाबदारी कोल इंडिया व्यवस्थापनाची असेल, असाही इशारा महामंत्री सुधीर घुरडे यांनी पत्राद्वारे दिला आहे. 








Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top