Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: आग विझविताना तीन वनमजुरांचा होरपळून मृत्यू ; दोन जखमी
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
नागझिरा जंगलाला लागली आग मुख्यमंत्र्यांनी तात्काळ घेतली दखल आयशा - आमचा विदर्भ कार्यालय प्रतिनिधी नागपूर - नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात ...

  • नागझिरा जंगलाला लागली आग
  • मुख्यमंत्र्यांनी तात्काळ घेतली दखल
आयशा - आमचा विदर्भ कार्यालय प्रतिनिधी
नागपूर -

नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात नागझिरा आणि पिटेझरी या दोन वनपरिक्षेत्रात लागलेली आग आटोक्यात आणण्याच्या प्रयत्नात तीन वनमजुरांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर दोघे जखमी झाले आहेत. ही घटना शुक्रवारी रात्री दोन वाजताच्या सुमारास घडली.

वन परिक्षेत्रात कक्ष क्रमांक ९७, ९८, ९९, १०० येथे आग लागल्याची घटना दिसून आल्यानंतर जवळपास ५० ते ६० वनकर्मचारी, अधिकारी आणि हंगामी मजूर आग विझवण्याचे काम करत होते. सायंकाळी ५ वाजता ही आग आटोक्यात आली, परंतु वाऱ्याने पुन्हा भडका उडाला आणि अचानक आगीने वेढल्याने व पहाडी जागा असल्याने वणवा विझवणाऱ्या तीन हंगामी मजुरांचा मृत्यू झाला.

मृत्यू पावलेल्या वन मजूरांमध्ये राकेश युवराज मडावी वय ४०, राहणार थाडेझरी, रेखचंद गोपीचंद राणे वय ४५ राहणार धानोरी, सचिन अशोक श्रीरंगे वय २७ राहणार कोसमतोंडी यांचा समावेश आहे. तर, विजय तीजाब मरस्कोले वय ४० राहणार थाडेझरी, ता. सडक अर्जुनी, जि. गोंदिया, राजू शामराव सयाम वय ३० राहणार बोरुंदा, जिल्हा गोंदिया यांचा जखमींमध्ये समावेश आहे. त्यांना पुढील उपचारासाठी नागपूरला हलवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत

मृतांच्या कुटुंबीयांना २० लाखांची मदत व शासकीय नोकरी देण्यात यावी. उपसंचालक पुनम पाटे यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवण्यात यावा, अशी मागणी गावकर्‍यांनी केली असून मृतदेह ताब्यात घेण्यास कुटुंबीयांनी नकार दिल्याची माहिती समोर येत आहे.

मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाखांची मदत
मृत मजूरांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली असून आगीत जखमी वनमजूरांच्या उपचाराचा खर्च ही शासन करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 






Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top