Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: शेत शिवारा लगत बिबट्याचा मृत्यू
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
बोथली (हेटी) जवळील घटना वृद्धपकाळामुळे बिबटयाचा मृत्यू - वनविभाग कुमारी पोर्णिमा फाले - आमचा विदर्भ तालुका प्रतिनिधी सावली - सावली येथून जवळ...

  • बोथली (हेटी) जवळील घटना
  • वृद्धपकाळामुळे बिबटयाचा मृत्यू - वनविभाग

कुमारी पोर्णिमा फाले - आमचा विदर्भ तालुका प्रतिनिधी
सावली -
सावली येथून जवळच असलेल्या बोथली (हेटी) शेत शिवारालगत बिबटयाचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली. वन कर्मचाऱ्यांच्या गस्ती दरम्यान बिबटयाच्या मृत्यु झाल्याचे समोर आले असून घटनाथळी वन कर्मचाऱ्यांची चमु धावुन आली. सावली वन परिक्षेत्रा अंतर्गत येत असलेल्या बोथली (हेटी) शेत शिवार गट क्र. 211 भागात बिबटयाचा मृत्यु झाला. हे वन कर्मचाऱ्यांच्या गस्ती दरम्यान समोर आले. नेहमी प्रमाणे वन कर्मचारी गस्ती वर असतांना बोथली (हेटी) शेत शिवारा लगत बिबट मृत अवस्थेत दिसला लागलीच या बाबतची सूचना वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली. वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. मृत बिबट हा आठ वर्षाचा होता. बिबट हा नर असून वृद्धपकाळामुळे त्याचा मृत्यु झाला असा अंदाज वन विभागाने लावला. यावेळी वन सहायक वनसंरक्षक (तेंदू) लखमावाड, जामभुले पशुधन विकास अधिकारी पंस मुल, रविकांत खोब्रागडे पशुधन विकास अधिकारी चंद्रपुर, डॉ. कुंधन पोटचलवार, मुकेश भादनकर वन्य जीवरक्षक उमेशसिंह तेजसिंह झिरे, वनपरिक्षेत्र अधिकारी व्ही.बी. कामडी, वनरक्षक चौधरी, सावली उपक्षेत्राचे धुर्वे व वन कर्मचारी उपस्थित होते. यांनी बिबटची पाहणी केली व पंचनामा केला. सावली हा तालुका जंगल व्याप्त असून वन्य जीवांचे या जंगलात वावर असून अनेक वन्य जीव या भागात वास्तव्यास आहेत. त्यामुळे नेहमीच या भागात मनुष्य आणि वन्यजीव असा संघर्ष निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. मात्र या बिबटयाचा मृत्यू वृद्धपकाळामुळे झाले असल्याचा कयास वनविभागाने लावला असून पुढील तपास सुरु आहे. 

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top