Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: बस फेऱ्यांच्या कमतरतेमुळे ग्रामीण प्रवासी निवारे झाले ओस.....
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
प्रवासी निवाऱ्यांची दुरावस्था अवैध वाहतुकीला चालना अनेक प्रवासी निवारे झाले झाळा झुळपाने लुप्त कुमारी पोर्णिमा फाले - तालुका प्रतिनिधी सावली...

  • प्रवासी निवाऱ्यांची दुरावस्था
  • अवैध वाहतुकीला चालना
  • अनेक प्रवासी निवारे झाले झाळा झुळपाने लुप्त

कुमारी पोर्णिमा फाले - तालुका प्रतिनिधी
सावली -
राष्ट्रीय महामार्ग सोडला तर ग्रामीण भागातील शहरासाठी जोडणाऱ्या रस्त्यावरुन धावणाऱ्या बसेसच्या अनियमित पणामुळे प्रवाश्यांसाठी निर्माण करण्यात आलेली प्रवासी निवारे ओस पडलेले दिसून येत आहेत. तर अनेक प्रवासी निवारे जनावरांचे निवास्थान बनले आहे. 'बहुजन हिताय बहुजन सुखाय' असे ब्रीद वाक्य असलेल्या राज्य परिवहन महामंडळाने जनकल्याण आणि जनतेचा प्रवास सुखरूप जावा यासाठी बसेस ची निर्मिती केली. राज्य राष्ट्रीय महामार्गा सोबतच परिवहन मंडळाची लाल परी ग्रामीण भागातही फिरू लागली. परंतु, ग्रामीण प्रवाश्यांचे कमी प्रमाण म्हणावे कि परिवहन मंडळाला परवडण्यासारखे नसावे की काय, सुरु असलेल्या ग्रामीण बसफेऱ्या कमी करून टाकल्या त्यामुळे ग्रामीण प्रवाश्यांचे हाल होत असून अवैध प्रवासी वाहतुकीला चालना मिळत आहे. याच संधीचा फायदा घेत अवैध प्रवासी वाहतूकदार ज्यादा पैसे घेत क्षमते पेक्षा जास्त प्रवासी कोंबून वाहतूक करतांना आढळून येत आहे. त्यामुळे भरधाव धावणाऱ्या अवैध प्रवासी वाहनांमुळे अपघाताची शक्यता वर्तविली जात आहे. बस फेऱ्यांच्या अनियमितपनामुळे आणि प्रवासी निवाऱ्याच्या दुरावस्थेमुळे प्रवाश्यांना भर उन्हात किंवा नाईलाजाने जवळच्या पान टपरीवर चाचपडत राहावे लागत आहे. सध्या लग्न सराई ची धूम सुरु असतांना कोरोना मुळे लग्नकार्यात काहीसे विरजन येत असले तरी लग्न समारंभाचा धड़ाका मात्र सुरु आहे. परिणामी या काळात प्रवाश्यांची मोठी गर्दी प्रवासी निवाऱ्या जवळ होत असते परंतु कमी बसफेऱ्या अभावी अवैध वाहतूकदरांची मनधरणी करण्याची पाळी निर्माण होत आहे. त्यामुळे अवैध वाहतुकीला उधान येत असून राज्य परिवहन महामंडळाला सुद्धा आर्थिक फटका बसत आहे. ग्रामीण बसफेऱ्या सुरु कारा अशी अनेकदा मागणी होत असतांना परिवहन मंडळाचे मात्र याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. हात दाखवून ही गाड़ी थांबत नाही अशी बसेसची मुजोरी हि झाल्यामुळे नाइलाजास्तव प्रवाश्यांना ट्रॅव्हल्स चा आधार घ्यावा लागतो. त्यामुळे राष्ट्रीय मार्गावर ट्रॅव्हल्स आणि बसेसची रेस लागली की काय असे चित्र पाहायला मिळत आहे. सावली तालुक्याच्या ग्रामीण भागाचा विचार केल्यास सावलीहुन कवठी, चामोर्शी, सावली, गोंडपिपरी, चारगांव, पाथरी, पाथरी, सिंदेवाही, व्याहाळ, निफन्द्र, गेवरा, हराम्बा, गडचिरोली, घोडेवाही आदि ग्रामीण रस्त्यावरून बसफेऱ्यांची कमतरता असून प्रवाश्यांचे बसेस विना हाल-बेहाल होत आहे. तरी या भागात बसफेऱ्या नियमित करण्यात याव्या अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. 






Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top