Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: संवर्ग विकास अधिकारीने केली जिबगांव ग्राम पंचायतीच्या कामाची पाहणी
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
पंतप्रधान आवास योजना अंतर्गत लाभार्थ्यांच्या घराची पाहणी करतांना संवर्ग विकास अधिकारी व नवनिर्वाचीत ग्रामपंचात सदस्य कुमारी पोर्णिमा फाले - ...

पंतप्रधान आवास योजना अंतर्गत लाभार्थ्यांच्या घराची पाहणी करतांना संवर्ग विकास अधिकारी व नवनिर्वाचीत ग्रामपंचात सदस्य

कुमारी पोर्णिमा फाले - तालुका प्रतिनिधी
सावली -
ग्रामविकासातून मानव विकासाकडे वाटचाल करतांना गावातील प्रत्येक नागरिकास आरोग्यदायी जीवन जगता यावे, असे वातावरण निर्माण करुन गावातील बालमृत्यू, कुपोषण कमी करणे, संसर्गजन्य रोग टाळण्यासाठी तरतूद करणे आणि आरोग्य सुधारण्यासाठी कामे करावी लागतात. गावातील प्रत्येक नागरिक शिक्षित असावा जेणेकरुन तो स्वावलंबी होऊन सुज्ञपणे स्वत:चे निर्णय स्वत: घेण्याची त्यात कुमक निर्माण होवो. गावातील शाळेत गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळो. शाळा गळती रोखण्यासाठी कसोटीने प्रयत्न, गावातील प्रत्येक नागरिकाला रोजगार, उत्पन्नाचे साधन उपलब्ध व्हावे जेणेकरून ते स्वावलंबी होतील व स्वत:च्या कुटुंबाची योग्य काळजी घेतील यासाठी स्वयंरोजगार व वेतनी रोजगारासाठी कौशल्यवृद्धी प्रशिक्षणाची व्यवस्था. दरडोई उत्पन्नात वाढ करण्याकरिता नियोजन असे विविध उपक्रम ग्राम पंचायती अंतर्गत राबविण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. याच अनुषंगाने,

सावली पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या जिबगांव ग्राम पंचायतीला पंस सावली येथील संर्वग विकास अधिकारी यांनी भेट देत गावाची पाहणी केली. त्यांनी ग्रापं इमारतीची पाहणी केल्यानंतर पंतप्रधान आवास योजनांचे लाभार्थ्यांच्या घरी प्रत्यक्ष भेट देवुन घराची पाहणी केली. लाभार्थ्यांनी त्यांच्या समस्या संर्वग विकास अधिकारी यांना सांगितल्या त्यांनी समस्यांचे लवकरच निराकरण करण्याच्या सूचना तत्सम अधिकाऱ्यांना दिल्या. गावकऱ्यांच्या हस्ते संर्वग विकास अधिकारी यांचे पुष्पगुच्छ देवुन स्वागत करण्यात आले. यावेळी नवनिर्वाचीत प्रभारी संरपच पुरुषोत्तम चुदरी, ग्रापं सदस्य राकेश गोलेपल्लीवार, सौ. मोनी उडिरवाडे, ग्रामसेवक आकनुलवार, आत्राम साहेब, ग्रापंतील कर्मचारीवृंद उपस्थित होते.






Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top