Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: पुर्नवसन केंद्रात मुलीचा लैंगिक छळ
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
मुलगी केंद्रात उपचार घेत होती प्रकरणी डॉक्टर व काळजीवाहकाविरुद्ध गुन्हा दाखल आयशा - आमचा विदर्भ प्रतिनिधी नागपूर - फेटरीतील लाइफस्कील्स पुर्...

  • मुलगी केंद्रात उपचार घेत होती
  • प्रकरणी डॉक्टर व काळजीवाहकाविरुद्ध गुन्हा दाखल
आयशा - आमचा विदर्भ प्रतिनिधी
नागपूर -
फेटरीतील लाइफस्कील्स पुर्नवसन केंद्रात उपचार घेत असलेल्या १६ वर्षीय मुलीचा लैगिंक छळ करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी कळमेश्वर पोलिसांनी संस्थाचालक डॉक्टर व काळजीवाहकाविरुद्ध अत्याचारासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. डॉ. अभिजित सेनगुप्ता व काळजीवाहक अनु राजन आर्चाय वय ३२ ,अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. प्रकरण दडपल्याने सेनगुप्ता यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित १६ वर्षीय मुलगी तणावात राहायची. नोव्हेंबर २०२० मध्ये नातेवाइकांनी तिला सेनगुप्ता यांच्या लाइफस्कील्स केंद्रात दाखल केले. अनु हा पीडित मुलीचा लैगिंक छळ करायला लागला. त्याने चार वेळा मुलीचा लैगिंक छळ केला. ‘लग्न करून मी तुला पुण्यात शिकवायला पाठवेल’,असे आमिष दाखविले. त्यानंतर त्याने तिच्यावर अत्याचारही केला. याबाबत कोणाला सांगितल्यास ठार मारण्याची धमकी दिली. ही बाब माहिती असतानाही सेनगुप्ता यांनी ती दडपली.

दरम्यान, पीडित मुलीच्या नातेवाइकांना याबाबत कळाले. नातेवाइकाने कळमेश्वर पोलिस स्टेशन गाठून तक्रार दिली. पोलिसांनी काळजीवाहक व डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आचार्य याला अटक केली. 






About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top