Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: व्हिडिओ काॅन्फरंन्सींग बैठकांवर निर्बंध घाला
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आमदार सुभाष धोटे यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी बैठकात गुंतल्याने अधिकारी, कर्मचाऱ्यांना परिस्थिती हाताळताना अडचणी अनिल गंपा...

  • आमदार सुभाष धोटे यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी
  • बैठकात गुंतल्याने अधिकारी, कर्मचाऱ्यांना परिस्थिती हाताळताना अडचणी

अनिल गंपावार - आमचा विदर्भ तालुका प्रतिनिधी
राजुरा -
राज्यात कोरोनाची विदारक परीस्थिती निर्माण होत असतांना मात्र जिल्हा प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी मंत्री महोदय, सचिव, आयुक्त अशा विविध स्तरांवरील व्हिडिओ काॅन्फरंन्सींग व्दारा आयोजित बैठकांमध्ये गुंतलेले असल्याने स्थानिक पातळीवर काम करणारे अधिकारी व कर्मचारी यांना अडचणी निर्माण होत आहेत. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील माहिती जाणुन घेणेसाठी वरीष्ठ अधिकारी यांनी आॅफीस बाहेर निघून ग्रामीण भागत फिरल्याशिवार स्थानिक परिस्थिती माहित होणार नाही. जिल्हयातील अधिकाऱ्यांच्या व्हिडिओ काॅन्फरंन्सींग मध्ये अधिक वेळ जात असल्याने त्यांना परिस्थिती आटोक्यात आणने सुध्दा कठीण जात आहे. 

तेव्हा सध्याची गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन व्हिडिओ काॅन्फरंन्सींग बैठका कमी करून जिल्हयातील अधिकाऱ्यांना ग्रामीण भागात फिरणेसाठी वेळ देण्यात यावी जेणेकरून येथे निर्माण झालेली भयानक परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी मदत होईल अशी मागणी राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. 






About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top