Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: चंद्रपूर जिल्हातील शासकिय रुग्णालयांना रेमडेसिविर इंजेक्शन व औषधांचा मुबलक पूरवठा करा
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आमदार सुभाष धोटे यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी अनिल गंपावार - आमचा विदर्भ तालुका प्रतिनिधी राजुरा - चंद्रपूर जिल्ह्यात कोरो...

  • आमदार सुभाष धोटे यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी
अनिल गंपावार - आमचा विदर्भ तालुका प्रतिनिधी
राजुरा -
चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना (कोविड-19) विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. दैनंदिन २० ते ३० नागरीकांना कोरोनामुळे आपला जिव गमवावा लागत आहे. जिल्हयात शासकीय रूग्णालयांमध्ये रेमडेसिविर इंजेक्शनची मोठ्या प्रमाणात नितान्त आवश्कता असतांना मात्र जिल्हा प्रशासनाकडुन खाजगी रूग्णालयांना मोठया प्रमाणात रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा केला जात असल्याचे निदर्शनास येते. शासकीय रूग्णालयातील रूग्णांवर योग्य वेळी योग्य उपचार होत नसल्याने व वेळीच शासकीय रूग्णालयातील गोरगरिब रूग्णाना रेमडेसिविर मिळत नसल्याने अनेकांना आपले जीव गमवावे लागत आहे. चंद्रपूर जिल्हयातील शासकिय रूग्णालयांस रेमडेसिविर मिळणे गरजेचे असताना खासगी रूग्णालयास अधिक पुरवठा होत असल्याने श्रीमंत लोकांनाच रेमडेसिविर इंजेक्शन मिळत आहे यामुळे रेमडेसिविर इंजेक्शन फक्त श्रीमंतांसाठीच आहेत काय ? असा सवाल काही सुज्ञ नागरीकांकडुन केला जात आहे. यात गरिब व श्रीमंत अशा प्रकारचा भेदभाव होत असल्याचे सामान्य नागरिकांकडुन बोलल्या जात आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणे विषयी ग्रामिण भागातील जनतेमध्ये तिव्र असंतोष निमार्ण झालेला आहे.

ही गंभीर बाब लक्षात घेऊन रेमडेसिविर इंजेक्शन वाटपाबाबत कुणावरही अन्याय होणार नाही याची खबरदारी घेऊन नियोजनबद्द पद्धतीने उपाययोजना करून जिल्हयातील शासकीय रूग्णालयांना प्राधान्याने रेमडेसीविर इंजेक्शन व औषधांचा पुरेसा पुरवठा करण्यात यावा जेणेकरून गोरगरीब जनतेला याचा लाभ होईल व अनेकांचे जीव वाचतील. करीता आपल्या माध्यमातून याबाबतच्या सुचना स्थानिक जिल्हा प्रशासनाला देण्यात याव्यात अशी मागणी राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्य मंत्री डॉ. सिंगणे आणि जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांना निवेदनाद्वारे केली आहे. 





Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top