Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: कोरोनाचा दुसरा डोज घेणाऱ्यांसाठी नवीन लसीकरण केंद्र सुरू करा - आमदार किशोर जोरगेवार
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी चंद्रपूर - नागरिकांचा संभ्रम दूर करत कोरोना लसीकरणाचा दुसरा डोज घेण्यासाठी येणाऱ्या नागरिकांसाठी वेगळे लसी...

शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
चंद्रपूर -
नागरिकांचा संभ्रम दूर करत कोरोना लसीकरणाचा दुसरा डोज घेण्यासाठी येणाऱ्या नागरिकांसाठी वेगळे लसीकरण केंद्र तयार करण्यात यावे अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी केली आहे.

कोरोना लसीकरण मोहीम मोठ्या प्रमाणात सुरू करण्यात आली आहे. यात ठराविक अंतरानंतर कोरोना लसीचा दुसरा डोज दिल्या जात आहे. मात्र याकरिता वेगळे लसीकरण केंद्र नसल्याने पहिला डोज आणि दुसरा डोज घेणाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. तसेच सदर लसीकरण केंद्रांवर मोठी गर्दी होत असल्याने नागरिकांची गैरसोयही होत आहे. यात अनेक नागरिकांना कोरोनाच्या दुसऱ्या डोज पासून वंचित राहण्याची वेळ येऊ शकते. ही बाब लक्षात घेता कोरोनाचा दुसरा डोज घेणाऱ्यांसाठी वेगळे लसीकरण केंद्र सुरू करण्यात यावे अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांच्या वतीने करण्यात आली आहे. 






About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top