Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: गुडी सजावट स्पर्धेचे पारितोषिके जाहीर
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
JCI राजुरा प्राईडच्या गुडी सजावट स्पर्धेत अनेक स्पर्धकांनी घेतला उत्फुर्तेने सहभाग अनिल गंपावार - आमचा विदर्भ तालुका प्रतिनिधी राजुरा - गुडी...

  • JCI राजुरा प्राईडच्या गुडी सजावट स्पर्धेत अनेक स्पर्धकांनी घेतला उत्फुर्तेने सहभाग
अनिल गंपावार - आमचा विदर्भ तालुका प्रतिनिधी
राजुरा -
गुडी पाडव्या दिनी JCI राजुरा प्राईड द्वारे ऑनलाईन गुडी सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते होते. या स्पर्धेत अनेक स्पर्धकांनी विशेषकर महिलांनी उत्स्फूर्तेने सहभाग घेतला. प्रथम पारितोषिक सौ. साधना राजू गौरशेट्टीवार, व्दितीय पारितोषिक सौ. सरोज राकेश क्षीरसागर तर तृतीय पारितोषिक सौ. शीतल चालखे यांनी मिळविला. स्पर्धकांना प्राईड तर्फे प्रमाणपत्र आणि भेंटवस्तू देण्यात आली. भेंटवस्तू नव्यानेच शुभारंभ झालेल्या आर.के. सुपर बाजार चे संचालकांकडून प्रॉन्सर्स करण्यात आल्या होत्या. स्पर्धेत शेकडोच्यावर स्पर्धकांनी ऑनलाईन भाग घेतला. 
दिवसभर घरी राहून टीव्हीवर केवळ कोरोना च्या बातम्या बघण्यापेक्षा घरीच राहून स्पर्धाच का होईना पण लोकांना मनोरंजनात गुंतवून ठेवण्यासाठी अश्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते असे आमचा विदर्भ च्या प्रतिनिधींशी बोलतांना प्राईड चे अध्यक्ष जेसी अंकुशसिंह चौहान यांनी सांगितले. 
स्पर्धेच्या यशस्वितेकरिता प्रकल्प निदेशक जेसिरेट पल्लवी चौहान, सचिव जेसी जाहिर लाखानी, संस्थापक अध्यक्ष जेसी श्रीगोपाल सारडा, माजी अध्यक्ष जेसी दीपक शर्मा, जेसी व्यंकटेश गड्डम, जेसी श्वेता जयसवाल, जेसी संदीप खोके, जेसी सरिता मालु, जेसी संदीप जैन, जेसी शंकर झवर, जेसी रमेश मंडल यांनी प्रयत्न केले.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top