- आतापर्यंत 23,026 जणांची कोरोनावर मात
- ॲक्टीव पॉझिटिव्ह 378
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 23 हजार 803 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 23 हजार 26 झाली आहे. सध्या 378 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत दोन लाख 17 हजार 178 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी एक लाख 91 हजार 292 नमुने निगेटीव्ह आले आहेत.
जिल्ह्यात आतापर्यंत 399 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 360, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 18, यवतमाळ 16, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.
आज बाधीत आलेल्या 43 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 23, बल्लारपूर तीन, भद्रावती 10, नागभिड एक, सिंदेवाही एक, मूल एक, चिमूर एक, कोरपना दोन व जीवती येथील एका रुग्णांचा समावेश आहे.
कोरोनाचे रूग्ण कमी-अधिक प्रमाणात बहुतांश तालुक्यातुन आढळून येत आहेत. नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करून सुरक्षीत राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.





टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.