राजुरा -
जागतिकीकरण झाल्या पासून संपूर्ण जगात प्रचंड उलथापालथ सुरू झाली आहे. अश्याही परिस्थितीत मराठी भाषिक लोकांनी आपली मराठी भाषा व मराठी संस्कृती जपून ठेवली तरच आपल्याला प्रगतीचा पुढील टप्पा गाठणे सहज शक्य होईल, असे प्रतिपादन आदर्श पतसंस्थेचे संचालक मिलिंद देशकर यांनी व्यक्त केले. राजूरा आगारा तर्फे बस स्थानक राजूरा येथे मराठी भाषा दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी मिलींद देशकर हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आगार प्रमुख आशिष मेश्राम यांनी भूषविले. श्री. खापर्डे यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी बोलतांना देशकर यांनी शिवाजी महाराजांनी अनेक परकीय आक्रमणे झाली असतानाही आपला महाराष्ट्र व मराठी भाषा यांचे संवर्धन केले. मराठी ही प्राचीन भाषा असून तिचा आपल्या सर्वाना सार्थ अभिमान असला पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाची सुरुवात प्रसिद्ध लेखक, भाषाप्रभू वि.वा. शिरवाडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाली. कार्यक्रमात अरविंद ठमके, मनोज कोल्हापूरे, मनोज पेंदोर, दौलत खिरटकर, कुलदीप दूबे, मुकेश मंढरे, श्रुतिका भगत, कल्पना नरसिंह, शितल ढवस व लक्ष्मी बत्तुलवार यांच्यासह अनेक नागरिक, विद्यार्थी व प्रवाशी सहभागी झाले.





टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.