Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: अंतिम आठवडा सुट्यांचा; बँकांच्या कामकाजावर होणार परिणाम
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
खासगीकरणाच्या निर्णयाविरुद्ध संघर्षरत असलेल्या सरकारी बँकांसाठी मार्चचा अंतिम आणि एप्रिलचा पहिला आठवडा सुट्यांचा आयशा - आमचा विदर्भ कार्यालय...

  • खासगीकरणाच्या निर्णयाविरुद्ध संघर्षरत असलेल्या सरकारी बँकांसाठी मार्चचा अंतिम आणि एप्रिलचा पहिला आठवडा सुट्यांचा

आयशा - आमचा विदर्भ कार्यालय प्रतिनिधी
नागपूर -
खासगीकरणाच्या निर्णयाविरुद्ध संघर्षरत असलेल्या सरकारी बँकांसाठी मार्चचा अंतिम आणि एप्रिलचा पहिला आठवडा सुट्यांचा राहणार आहे. विविध कारणांनी सलग २७ ते ३१ मार्च सुटी येणार असून १, २ आणि ४ एप्रिलला देखील बँका बंद राहणार आहेत.

मार्च महिन्यात १३ ते १६ मार्च असे चारदिवस सरकारी बँका बंद होत्या. खासगीकरणाविरुद्ध पुकारण्यात आलेला संपामुळे १५ आणि १६ मार्चला बँक कर्मचाऱ्यांचे कामबंद होते. तर त्यापूर्वी आलेला दुसरा शनिवार आणि रविवारमुळे बँकांना सुटी असते. त्यादरम्यान कोट्यवधीचे आर्थिक व्यवहार ठप्प झाले होते. दोनदिवसांच्या संपादरम्यान अंदाजे चार ते पाच हजार कोटींचे व्यवहार थांबल्याची माहिती कर्मचारी संघटनांनी दिली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा बँकांना सलग सुट्या आल्या आहेत. मार्च अखेरमुळे बँकांमध्ये आर्थिक ताळेबंद तयार करण्याची घाई सुरू आहे. अशात करोनामुळे अनेक ठिकाणी निर्बंध कडक असल्याने बँकांमधील उपस्थितीही रोडावली आहे. पेन्शन, निराधार योजनेचे मानधन आदींमुळे आता बँकांमध्ये गर्दी वाढत आहे. बँकातील आर्थिक व्यवहार पूर्ण करायचे असल्यास ते २६ मार्चपर्यंत करणे आवश्यक होऊन बसले आहे. त्यानंतर आठ दिवस बँकांना सुट्या राहणार आहेत. परिणामत: बँका उघडताच गर्दी होऊन सुरक्षित वावरचे उल्लंघन होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्याचसोबत बँकाच्या एटीएमवर पडणारा भार पाहता पुरेशी रोख सोबत बाळगण्याचा सल्ला देण्यात येत आहे.

अशी राहणार आहे सुट्टी.....

  • - २७ मार्च : दुसरा शनिवार
  • - २८ मार्च : रविवार
  • - २९ मार्च : धूलिवंदन
  • - ३० मार्च : मार्च अखेरचा दिवस
  • - ३१ मार्च : सार्वजनिक व्यवहार बंद
  • - १ एप्रिल : अकाउंट क्लोजिंगचा दिवस
  • - २ एप्रिल : गुड फ्रायडे
  • - ४ एप्रिल : रविवार 



About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top