Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: स्मार्ट ग्राम मंगी (बु.) येथे शहीद क्रांतीवीर बाबुराव शेडमाके यांची जयंती मोठया उत्साहात संपन्न
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
अनिल गंपावार - आमचा विदर्भ तालुका प्रतिनिधी राजुरा - राजुरा तालुक्यातील स्मार्ट ग्राम, मंगी (बु) येथे दिनांक 12 मार्च 2021 ला स्मार्ट ग्राम ...


अनिल गंपावार - आमचा विदर्भ तालुका प्रतिनिधी
राजुरा -
राजुरा तालुक्यातील स्मार्ट ग्राम, मंगी (बु) येथे दिनांक 12 मार्च 2021 ला स्मार्ट ग्राम मंगी (बु) च्या वतीने शहीद क्रांतीवीर बाबुराव शेडमाके यांची जयंती मोठया उत्साहात संपन्न झाली. सर्वप्रथम शहीद क्रांतीवीर बाबुराव शेडमाकेचे प्रतिमेचे पुजन करुन पुष्पमाला अर्पण करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष गावपाटील सोमाजी पा. कोडापे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून जि.प.चे माजी सदस्य भिमराव पुसाम‍, ग्राम विकास समितीचे अध्यक्ष परशुरामजी तोडासाम, ग्रा.पं. मंगी (बु) चे उपसरपंच वासुदेव चापले, जेष्ठ नागरिक पैकुजी पा. मडावी, जलपत पा. कोडापे, यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अरविंद कोडापे यांनी केले. या कार्यक्रमासाठी भाऊराव सिडाम, प्रकाश वेडमे, रामभाऊ तलांडे, शंकर कन्नाके, प्रभाकर मडावी, विश्वेश्वरराव मरस्कोल्हे, चंदूजी तोडासे, शामराव कन्नाके, ज्ञानेश्वर आडे, बिरशाव परचाके, माधव कुमरे, पुंजाराम गेडाम, आनंदराव मडपती, जयपाल मडावी, भिमराव कन्नाके, गणपत चापले, किसन कोडापे, रामशाव कन्नाके, शंकर तोडासे, गणपत कोडापे, मेंगोराव कोडापे, शरद पुसाम, बालाजी गेडाम, माधव कुमरे, पंकज वेडमे, श्रीकृष्ण तोडासाम, सोनु कुमरे, नितीन मरस्कोल्हे, वसंत सोयाम, बालाजी गेडाम, रामशाव कुळमेथे, पंकज मरस्कोल्हे, प्रशांत कोडापे, संतोष कोडापे, मारोती कन्नाके, रमेश कोडापे, धर्मा पुसाम, नामदेव सोयाम, प्रविण कोटनाके, रवी कुळसंगे, विनोद आत्राम, सुरेश आडे, नमन तोडासे यांनी मोलाचे सहकार्य केले. गावात आनंदमय वातावरण निर्माण झाले. 


About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top