Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: हायब्रीड अॅन्युईटी अंतर्गत सुरू असलेली राजुरा तालुक्यातील रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करा - राजु घरोटे
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
शिष्टमंडळाव्दारे बांधकाम विभागास निवेदन सादर अनिल गंपावार - आमचा विदर्भ तालुका प्रतिनिधी राजुरा - रस्ते हे ग्रामिण विकासाची नाडी असल्यामुळे ...

  • शिष्टमंडळाव्दारे बांधकाम विभागास निवेदन सादर

अनिल गंपावार - आमचा विदर्भ तालुका प्रतिनिधी
राजुरा -
रस्ते हे ग्रामिण विकासाची नाडी असल्यामुळे प्रमुख रस्त्यांना तसेच गावांना जोडण्याकरीता केंद्र सरकारने अनेक दुर्लक्षीत व दुर्दशायुक्त रस्त्यांचे कामे हायब्रीड अॅन्युइटी योजने अंतर्गत प्रस्तावित करून या रस्त्यांचे बांधकाम युध्दपातळीवर पूर्ण करण्याचे उद्दीष्ट दिले. परंतु रस्त्यांची ही कामे रेंगाळलेली  असल्यामुळे लोकांना होत असलेल्या त्रासाची दखल घेवून भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राजु घरोटे यांनी बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांची शिष्टमंडळासह भेट घेऊन राजुरा तालुक्यातील वरील योजनेअंतर्गत सुरू असलेल्या रस्त्यांची कामे युध्दपातळीवर पूर्ण करण्यात यावी अशा आशयाचे निवेदन सादर केले. 

राजुरा तालुक्यातील पडोली ते राजुरा व्हाया कढोली - पोवनी रस्ता तसेच वनसडी ते पोवनी व्हाया नांदगांव-साखरी या रस्त्याचे बांधकाम सुरू झाले असले तरी ह्या रस्त्याचे काम बराच कालावधी लोटुनही रखडले असल्याने या मार्गावरून येणाऱ्या जाणाऱ्या ग्रामिण भागातील नागरीकांना व वाहनधारकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या दोन्ही रस्त्यांचे बांधकाम शिघ्रगतीने पूर्ण करण्यात यावे व नागरीकांना होत असलेला त्रास दुर करावा असे आवाहन राजू घरोटे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन सादर करून केले. राजू घरोटे यांनी या निवेदनाची एक प्रत माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांना सादर करून सदर रस्त्यांची कामे निर्धारीत वेळेत पूर्ण करण्यासाठी संबंधीत अधिकाऱ्यांना सुचना द्यावी अशी मागणी केली. 

राजु घरोटे यांच्या नेतृत्वात सा.बा. विभागाच्या अधिकाऱ्यांना भेटलेल्या शिष्टमंडळात कढोलीचे सरपंच राकेश हिंगाने, सदस्य शैलेश चटके, अक्षय बोबडे, अंकुश आत्राम उपस्थित होते. 




About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top