Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: रामाळा तलाव प्रदुषणमुक्तीसाठी उद्योजकांनी सामाजिक दायित्व स्विकारावे
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
सि.एस.आर. बैठकीत जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांचे उद्योजकांना आवाहन शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी चंद्रपूर - शहरातील ऐतिहासिक रामाळा तलाव...

  • सि.एस.आर. बैठकीत जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांचे उद्योजकांना आवाहन
शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
चंद्रपूर -
शहरातील ऐतिहासिक रामाळा तलाव प्रदुषणमुक्त करुन सौंदर्यीकरण करण्यासाठी  उद्योजकांनी सामाजिक बांधिलकी अंतर्गत (सि.एस.आर.) सकारात्मक प्रतिसादर द्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी काल सि.एस.आर. प्रमुखांच्या आढावा सभेत जिल्हाधिकारी कार्यालयात वीस कलमी सभागृहात केले.

रामाळा तलावातील गाळ काढणे, एस.टी.पी. बसविणे, रिटेनिंग वॉलचे काम व पुल बांधण्याचे कामे मंजुरीबाबत शासनास प्रस्ताव पाठविलेला आहे. सामाजिक बांधिलकी अंतर्गत उद्योजक कंपनी यांनी निधीची व्यवस्था करावी किंवा मशीनरी उपलब्ध करुन द्यावी, याबाबत येत्या सात दिवसात सर्व उद्योजक प्रमुखांनी आप-आपले सहकार्य उपजिल्हाधिकारी (रोहयो) यांच्या कार्यालयास कळवावे. उद्योजकाचे योगदान कशाप्रकारे प्राप्त होईल याबाबत पुनश्च: आढावा बैठक घेण्यात येईल असे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी यावेळी सांगितले.

आढावा सभेस अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, उपजिल्हाधिकारी (रोहयो) पल्लवी घाटगे, कार्यकारी अभियंता पाटबंधारे श्याम काळे, उपकार्यकारी अभियंता पाटबंधारे (यांत्रिकी) श्री. बिसने, इकोप्रोचे प्रतिनिधी व जिल्ह्यातील उद्योजग प्रमुख उपस्थित होते. 




About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top