मनोज सोगलकर - विशेष प्रतिनिधी
चंद्रपूर -
देशात दारू व्यसन मुक्तीची चळवळ उभारणारे प.पूज्य शेषराव महाराज यांची आज २०वी पुणयतिथी. त्यांच्या पुण्यतिथी चे औचित्य साधून चंद्रपूर जिल्ह्यात पुण्यतिथी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दरवर्षी याच तारखेला जिल्हा बुलढाना शिरपूर येथील महाराज्यांच्या पुण्यतिथी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत होते. या कार्यक्रमाला संपूर्ण देशातून हजारोच्या संख्येने लोक उपस्थित राहत होते. परंतु कोरोना महामारीमूळे यावर्षीचा कार्यक्रम रद्द करण्यात आला. मौजा सोनुर्ली तालुका राजुरा येथील व्यसन मुक्ती मार्गदर्शन व सत्संग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष अनिल डोंगरे जिल्हा अध्यक्ष व्यसन मुक्ती संघटना जिल्हा चंद्रपूर तर प्रमुख पाहुणे लक्ष्मीकांत धानोरकर जिल्हा उपाध्यक्ष, पंडित काळे जिल्हा कोषाध्यक्ष, मंगेश गुरुनुले उपसभापती प.स.राजुरा हे होते. याकार्यक्रमाव्यतिरिक्त राजुरा तालुका चिंचोली, चंद्रपूर तालुका अजयपूर, सालेझरी, गोंडपिपरी तालुका, आंजनगाव, वरोरा तालुका इत्यादी गावातील प.पूज्य शेषराव महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून व सोशल डीस्टेगिंचे पालन करून कार्यक्रम घेण्यात आले. या कार्यक्रमाला बालाजी बोरकुटे जिल्हा संघटक, दिगांबर वासेकर तालुका अध्यक्ष राजुरा, प्रकाश आगमवार, आनंदराव सोणूर्ले, भिकाजी शेंडे. अनिल निरांजने, अविनाश राऊत, महादेव मांडवकर, नारायण खापने, अरुण बावणे यांनी विशेष परिश्रम घेतले.













टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.