Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: चंद्रपूर देशात दुसरे उष्ण शहर, ४३.६ अंश तापमानाची नोंद
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
तर प्रथम ओडिशातील भरिपदा येथे ४४.६ अंश तापमानाची नोंद गेल्या चार दिवसांपासून विदर्भात सूर्य तापण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. विदर्भातील सर...

  • तर प्रथम ओडिशातील भरिपदा येथे ४४.६ अंश तापमानाची नोंद
  • गेल्या चार दिवसांपासून विदर्भात सूर्य तापण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. विदर्भातील सर्वच जिल्ह्यांत पाऱ्याने चाळिशी ओलांडली असून विदर्भ आता हळूहळू तापू लागला आहे.
  • दरम्यान, मंगळवारी चंद्रपूर हे देशातील दुसऱ्या क्रमांकाचे उष्ण शहर ठरले.
  • मंगळवारी देशात ओडिशातील भरिपदा येथे ४४.६ अंश तर त्याखालोखाल चंद्रपूरात ४३.६ अंश तापमानाची नोंद करण्यात आली.

आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
नागपूर -
गेल्या चार दिवसांपासून विदर्भात सूर्य तापण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. विदर्भातील सर्वच जिल्ह्यांत पाऱ्याने चाळिशी ओलांडली असून विदर्भ आता हळूहळू तापू लागला आहे. दरम्यान, मंगळवारी चंद्रपूर हे देशातील दुसऱ्या क्रमांकाचे उष्ण शहर ठरले.

मंगळवारी देशात ओडिशातील भरिपदा येथे ४४.६ अंश तर त्याखालोखाल चंद्रपूरात ४३.६ अंश तापमानाची नोंद करण्यात आली. चंद्रपूर हे राज्यातील सर्वाधिक उष्ण शहर ठरले. त्याखालोखाल ब्रह्मपुरी येथे ४३ अंश तापमानाची नोंद करण्यात आली. शहरातसुद्धा पारा ४१.९ अंशांपर्यंत पोहोचला होता. शहरात दिवसभर उष्णता जाणवत होती. रात्रीसुद्धा त्यातून फारसा दिलासा मिळालेला नव्हता. त्यामुळे अनेक घरांमध्ये कुलर सुरू झालेत.

विदर्भात वाशिम येथे ४१ इतक्या सर्वाधिक कमी किमान तापमानाची नोद करण्यात आली. यावरून विदर्भातील उष्णतेचा अंदाज येतो. गुरुवारपासून शहरातील वातावरण अंशत: ढगाळ असेल. परंतु, तरीही पुढील काही दिवस तापमानाची ही स्थिती कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. 






About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top