Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: जिजाऊ योजनेच्या फसव्या जाहिरातीपासून सावध रहा
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
जिल्हा महिला व बालविकास अधिकारी रमेश टेटे यांचे आवाहन शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी चंद्रपूर - दिनांक 1 मार्च 2020 ते 28 फेब्रुवारी 2021...

  • जिल्हा महिला व बालविकास अधिकारी रमेश टेटे यांचे आवाहन
शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
चंद्रपूर -
दिनांक 1 मार्च 2020 ते 28 फेब्रुवारी 2021 या कालावधीत ज्या घरातील 21 ते 70 या वयोगटातील कर्त्या व्यक्तीचे निधन झाले आहे, अशा घरातील प्रत्येक विधवा महिलांना महिला व बाल विकास विभागाच्या जिजामाता / जिजाऊ या योजनेअंतर्गत रुपये 50 हजार लाभ मिळतील अशी खोटी माहिती सोशल मिडियावर पसरत असल्याचे निदर्शनात आले आहे. ही माहिती पुर्णत: खोटी व बनावट असून अशा प्रकारची कोणतीही योजना जिल्हा महिला व बाल विकास विभागामार्फत कार्यान्वित नाही. या संदेशामुळे नागरिकांची फसवणुक होण्याची शक्यता असून नागरिकांनी या खोट्या प्रचाराला बळी पडू नये, असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी रमेश टेटे यांनी कळविले आहे. 


About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top