Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: अँड. वामनराव चटप यांना राष्ट्रीय पातळी वरील भारत ज्योती अवॉर्ड
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
9 एप्रिल ला नवी दिल्ली येथे प्रदान होणार अनिल गंपावार - आमचा विदर्भ प्रतिनिधी चंद्रपूर - इंडिया इंटरनॅशनल फ्रेंडशिप सोसायटी, नवी दिल्ली द्वा...

  • 9 एप्रिल ला नवी दिल्ली येथे प्रदान होणार
अनिल गंपावार - आमचा विदर्भ प्रतिनिधी
चंद्रपूर -
इंडिया इंटरनॅशनल फ्रेंडशिप सोसायटी, नवी दिल्ली द्वारे दिला जाणारा राष्ट्रीय पातळीवरील प्रतिष्ठेचा समजला जाणारा "भारत ज्योती अवॉर् " शेतकरी संघटनेचे जेष्ठ नेते माजी आमदार अँड.वामनराव चटप यांना घोषित झाला असून दिनांक 9 एप्रिल 2021 ला नवी दिल्ली येथे त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे.

अँड. वामनराव चटप हे गेल्या चाळीस वर्षापासुन राजकिय, सामाजिक, शेती व वकीली क्षेत्रात कार्यरत असून त्यांना सार्वजनिक क्षेत्रात कार्याचा दांडगा अनुभव आहे. आमदार असतांना उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार त्यांना मिळाला असून ते शेतकरी संघटनेचे माजी अध्यक्ष तथा विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अध्यक्ष आहेत. अँड. चटप शेतकरी व  कष्टकरी जनतेसाठी तसेच स्वतंत्र विदर्भासाठी आंदोलन करणारे लढवय्ये नेते आहेत. नक्षलवादी क्षेत्राचे पंधरा वर्षे आमदार म्हणुन प्रतिनिधित्व करतांना कुठलीही सुरक्षा न घेणारे, सार्वजनिक जीवनात पारदर्शकता व चारित्र्य राखणारे तसेच शेतकर्‍यांना आर्थिक स्वातंत्र्य मिळावे, शेतमालाला रास्त भाव मिळावा आणि तंत्रज्ञान व बाजारपेठेचे स्वातंत्र्य मिळावे, यासाठी चाळीस वर्षापासुन अव्याहतपणे लढा देत आहेत. अँड. चटप हे दारूबंदीचे कट्टर पुरस्कर्ते असून त्यांच्या विविध क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन आणि जीवनातील पैलूला प्राधान्य देऊन त्यांची या अवॉर्ड साठी निवड करण्यात आली आहे. यापुर्वी महाराष्ट्रातून हा पुरस्कार ख्यातनाम क्रिकेटपटू सुनील गावस्कर आणि शिक्षणमहर्षी व बिहारचे राज्यपाल डी.वाय.पाटील या दोघांनाच मिळाला होता. विदर्भातून हा सन्मान मिळणारे अँड.चटप हे पहिले व्यक्ती आहेत, हे विशेष.

हा अवॉर्ड दिनांक 9 एप्रिल 2021 रोजी इंडिया इंटरनॅशनल सेंटर, मल्टिपरफज हॉल, न्यू बिल्डिंग, मॅक्समुलर मार्ग, लोधी गार्डन, नवी दिल्ली येथे राष्ट्रीय पातळीवरील मान्यवरांचे हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. 

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top