Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: जेसीआय राजुरा प्राईड चा १३ वा पदग्रहण सोहळा संपन्न
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
जेसी अंकुशसिंह चौहान यांनी घेतली २०२१ अध्यक्षपदाची शपथ आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स राजुरा - शहरातील नावाजलेली व्यक्तिमत्व विकास संघटना जे...

  • जेसी अंकुशसिंह चौहान यांनी घेतली २०२१ अध्यक्षपदाची शपथ
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
राजुरा -
शहरातील नावाजलेली व्यक्तिमत्व विकास संघटना जेसीआय राजुरा प्राईड चा १३ वा पदग्रहण सोहळा संपन्न झाला. या पदग्रहण सोहळ्यात मंचावर प्रमुख अतिथी म्हणून झोन १३ चे अध्यक्ष जेसी अनुप गांधी, झोन उपाध्यक्ष जेसी संजय गुप्ता, अक्षय तुगनाईट, जेसीआय इंडिया चे व्यवसाय आणि डिजिटल नेटवर्किंग कमिटीचे सदस्य जेसी मेघनाथ जानी, जेसीआय राजुरा प्राईडचे संस्थापक अध्यक्ष जेसी श्रीगोपाल सारडा प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात जेसी आस्था पठण ने करण्यात आली. आस्था पठण शिवांश जयस्वाल यांनी केले. मावळती अध्यक्ष सरिता मालू यांनी त्यांच्या कार्यकाळात केलेल्या कार्याचा लेखाजोखा मांडून अहवाल सादर केला. सरिता मालू यांनी त्यांच्या कार्यकाळात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या जेसी सदस्यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव केला. पुरस्कार सोहळ्यानंतर नवनिर्वाचित अध्यक्ष जेसी अंकुशसिंह चौहान यांनी रुबाबदार पद्धतीने फटाक्यांच्या आतिषबाजीत पदभार स्वीकार केला. 

भव्यदिव्य समारंभात मावळती अध्यक्ष जेसी सरिता मालू यांनी जेसी अंकुशसिंह चौहान यांना पिन, कॉलर, गव्हल तसेच अध्यक्ष पदाची शपथ देऊन पदभार हस्तांतरित केला. त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी नवनिर्वाचित अध्यक्षांना शुभेच्छा देत आपले मनोगत व्यक्त केले. झोन अध्यक्ष जेसी अनुप गांधी यांनी जेसीआय संस्थेच्या २०२१ च्या व्हिजनवर प्रकाश टाकला व १८ ते ४० वयोगटातील तरुणांना व्यक्तीमत्व विकासाकरिता जेसिस मध्ये प्रवेश घेण्याचे आवाहन केले. नूतन सदस्यांनी जेसिस ची शपथ घेतली. कार्यक्रमात प्रतिष्ठित नागरिक, चंद्रपूर जिल्हा जेसी परिवारातील सदस्य उपस्थित होते. यावेळी प्राईडचे माजी अध्यक्ष दीपक शर्मा, व्यंकटेश गड्डम, संदीप खोके, दिलीप निमकर, सरिता मालू, राजेश जयस्वाल, डॉ. रमेश मंडल, शंकर झंवर, सतीश कुचनकर, सुषमा शुक्ला, स्वतंत्रकुमार शुक्ला व जेसी परिवारातील सदस्य उपस्थित होते. संचालन जेसी श्वेता जयस्वाल तर आभार जेसी जहीर लखानी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता JCI राजुरा प्राईडच्या सदस्यांनी मोलाचे सहकार्य केले. 






Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top