Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: गाव कारभाऱ्यांनी गावाच्या समृद्धीसाठी सेवाकार्य करावे - आमदार सुभाष धोटे
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
राजुरा काँग्रेसच्या वतीने सरपंच /उपसरपंच / सदस्यांचा सत्कार अनिल गंपावार - आमचा विदर्भ तालुका प्रतिनिधी राजुरा - राजुरा काँग्रेसच्या वतीने ग...

  • राजुरा काँग्रेसच्या वतीने सरपंच /उपसरपंच / सदस्यांचा सत्कार
अनिल गंपावार - आमचा विदर्भ तालुका प्रतिनिधी
राजुरा -
राजुरा काँग्रेसच्या वतीने गांधी भवन राजुरा येथे राजुरा व कोरपणा तालुक्यातील काँग्रेसच्या सर्व नवनिर्वाचीत सरपंच / उपसरपंच व सदस्यांचा सत्कार करण्यात आला. सर्वांना सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि प्रमाणपत्र देऊन आमदार सुभाष धोटे आणि विचार मंचावर उपस्थित मान्यवरांचे हस्ते गौरविण्यात आले. 

या प्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना आमदार सुभाष धोटे यांनी सांगितले की, भारत हा कृषी प्रधान देश आहे. ग्रामीण संस्कृती हीच आपल्या देशाची खरी ओळख आहे. महात्मा गांधींचा विश्वास होता की ग्रामीण भागातील परिस्थिती सुधारेल, तेथे समृद्धी येईल तेव्हाच खऱ्या अर्थाने देश बलशाली भारत बनेल. तेव्हा आपण सर्व सरपंच / उपसरपंच / सदस्य गावाच्या विकासासाठी, समृद्धीसाठी आणि सुधारणेसाठी प्रामाणिकपणे सेवाकार्य केले पाहिजेत. सर्व घटकांना सोबत घेऊन जनसेवेच्या कार्यात सातत्याने पुढाकार घेतला पाहिजे. शासनाच्या विविध योजना गावात सर्वांच्या सहकार्याने राबवून आपण गावपातळीवर एक व्यापक परिवर्तन आणि विकास घडवून आणू शकतो. यामुळे निश्चितपणे आपल्या माध्यमातून एक आदर्श गाव निर्माण होण्यास मदत होईल याची मला पूर्ण खात्री आहे. ग्रामीण भागात विकासकामांना गती देण्यासाठी आवश्यक सर्व प्रकारचे सहकार्य मी निश्चितपणे करणार आहे. ते पुढे म्हणाले कि राजुरा तालुक्यातील ग्रामपंचायत मध्ये १२ ठिकाणी कॉंग्रेसचे सरपंच तर ११ ठिकाणी उपसरपंच आहेत. कोरपना तालुक्यात ५ ठिकाणी कॉंग्रेसचे सरपंच तर ६ ठिकाणी उपसरपंच आहेत. गोंडपिपरी तालुक्यात २२ ठिकाणी कॉंग्रेसचे सरपंच तर २६ ठिकाणी उपसरपंच आहेत.

राजुरा विधासभा क्षेत्रात आपण विकास कामांना गती दिली असून राजूरा बामणी रस्त्यावरील उडानपुलाचे काम, अध्यायावत उपजिल्हा रुग्णालयाचे काम, राजुरा, गोंडपिपरी, जिवती व कोरपना येथे प्राथमिक आरोग्य केंद्राचे कामे पूर्णत्वास आली आहेत. राजुरा येथे पशुसंवर्धन विभागाचे सर्व चिकित्सालयाच्या कामास लवकरच सुरुवात होणार आहे अशी माहिती त्यांनी दिली. तसेच या कार्यक्रमानंतर लगेच पत्रकार परिषद घेऊन त्यांनी सविस्तर माहिती दिली. 

याप्रसंगी- राजुरा नगर परिषदेचे नगराध्यक्ष अरुण धोटे, जेष्ठ नेते दादा पाटील लांडे, अब्दुल हमीद अब्दुल गाणी पटेल, कोरपना तालुका कॉंग्रेसचे अध्यक्ष विठ्ठलराव थिपे, राजुरा तालुका कॉंग्रेस अध्यक्ष रंजन लांडे, आदिवासी नेते श्यामराव कोटनाके, सेवादल अध्यक्ष दिनकर कर्नेवर, ऑड. सदानंद लांडे, जि.प.सदस्य  मेघा नलगे, विनाताई मालेकर, प. स. सभापती मुमताज अब्दुल जावेद, उपसभापती मंगेश गुरुनुले, सुरेश पाटील मालेकर, बंडू पाटील चौधरी, वामन पाटील राजुरकर, ओबीसी सेलचे उमाकांत धांडे, प.स. सदस्य तुकाराम मानुसमारे, रामदास पुसाम, कुंदाताई जेणेकर, माजी नगराध्यक्ष स्वामी येरोलवार, उपनगराध्यक्ष सुनील देशपांडे, न.प सदस्य गजानन भटारकर, दिपा करमनकर, संध्या चांदेकर, गीता रोहने, साधना भाके, महिला काँग्रेस अध्यक्षा कविता उपरे, कवयित्री संगीता धोटे, कृ.उ.बा.स संचालक अविनाश जेणेकर, मुर्लीधरराव बल्की, घनशाम नांदेकर, राजुरा शहर अध्यक्ष संतोष गटलेवार, कार्या अध्यक्ष नंदकिशोर वाढई, युवक शहर अध्यक्ष अशोक राव, कोरपना युवक कॉंग्रेस अध्यक्ष शैलेश लोखंडे, कवडू सातपुते, लहू चहारे, धनराज चिंचोलकर, सर्वानंद वाघमारे, वसंता ताजने, विकास देवाडकर, इर्शाद शेख, वामन वाटेकर, साबीर सय्यद, हरीशचंद्र जुनघरी, संतोष इंदुरवार, सुमित्रा कुचनकर, अर्चना गर्गेलवार, वर्षा पिंगे, शुभांगी खामनकर, शिला टाले, कार्यक्रमाचे संचालन राजुरा विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष एजाज अहमद यांनी केले. प्रास्ताविक राजुरा तालुका कॉंग्रेसचे अध्यक्ष रंजन लांडे यांनी केले तर आभार प्रदर्शन  कोरपना तालुका युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष शैलेश लोखंडे यांनी केले. कार्यक्रमात राजुरा कोरपना तालुक्यातील कॉंग्रेसचे सर्व सरपंच, उपसरपंच, सदस्य आणि राजुरा, कोरपना तालुका काँग्रेस कमेटी, सेवादल काँग्रेस,  महिला कॉंग्रेस, अल्पसंख्याक विभाग, अनु.जाती जमाती विभाग, किसान काँग्रेस, तालुका युवक कॉंग्रेस, शहर काँग्रेस, शहर युवक कॉंग्रेस, एन.एस.यु.आय इत्यादी विभागाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि काँग्रेसप्रेमी नागरिक उपस्थित होते. 




Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top