Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: जोगापूर जंगल सफारी चे आमदार सुभाष धोटे यांचे हस्ते शुभारंभ
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
अनिल गंपावार - आमचा विदर्भ तालुका प्रतिनिधी राजुरा - ताडोबा अभयारण्याला लागून असलेल्या प्रादेशिक वनक्षेत्रात जंगल सफारी सुरु करण्याचा मुख्यव...

अनिल गंपावार - आमचा विदर्भ तालुका प्रतिनिधी
राजुरा -
ताडोबा अभयारण्याला लागून असलेल्या प्रादेशिक वनक्षेत्रात जंगल सफारी सुरु करण्याचा मुख्यवनसंरक्षक एन.आर. प्रवीण यांनी मानस केला असून त्या दृष्टिकोनातून त्या क्षेत्राची पाहणी केली आणि बलारपूर तालुक्यातील कारवा, भद्रावती, चोरा येथे प्रादेशिक जंगल सफारी सुरू केली याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याने आज दिनांक २० फेब्रुवारी पासून राजुरा तालुक्यातील जोगापूर वनक्षेत्रात जंगल सफारी सुरू करण्यात आली आहे. आमदार सुभाष धोटे यांचे हस्ते या जंगल सफारीचा शुभारंभ करण्यात आले.

याप्रसंगी नगराध्यक्ष अरुण धोटे, उपनगराध्यक्ष सुनील देशपांडे, मुख्य वनसंरक्षक डाॅ.एन.आर. प्रवीण, मध्य चांदा वन विभागाचे उपवन संरक्षक अरविंद मुंढे, विभागीय वन अधिकारी राम धोत्रे, माजी नगराध्यक्ष स्वामी एरोलवार, पंचायत समिती सभापती मुमताज अब्दुल जावेद, जि.प. सदस्या मेघाताई नलगे, उपसभापती मंगेश गुरनुले यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. 

यानंतर मान्यवरांना वनपरिक्षेत्र अधिकारी विदेशकुमार गलगट यांनी जोगापूर जंगल सफारी क्षेत्रातील विशेष प्रेक्षणीय स्थळ, वन्यप्राणी त्यांचे अधिवास, वनस्पती, झाडे, तलाव बाबत माहिती दिली नंतर प्रमुख मान्यवरांनी जंगल सफारी चा आनंद घेतला. 




About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top