- चिल्लावार हॉस्पिटल चा पुढाकार
राजुरा -
दरवर्षी माघ महिन्यात गणेश जयंती निमित्य स्थानिक चिल्लावार कुटुंबीय भारत चौक येथील श्री गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रमासोबतच महाप्रसादाचा कार्यक्रम करीत असतात. यादिवशी हजारों भाविक दर्शनासोबतच महाप्रसादाचा लाभ घेत असतात. परंतु यावर्षी पारंपरिक अनुष्ठानाला बगल देत "शुभमं करोति कल्याण आरोग्य धन संपदा" सर्वांचे आरोग्य सुदृढ राहो या अनुषंगाने चिल्लावार हॉस्पिटल द्वारे दि. १५ फेब्रुवारीला गणेश जयंती निमित्य निःशुल्क रोग निदान व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिरात मधुमेह, रक्तदाब, हृदयरोग, न्यूरोपॅथी, बोन डेन्सिटी, पल्मोनरी फंक्शन (PFT), थॉयराईड सारख्या दुर्धर आजारावर सुप्रसिद्ध मधुमेह व हृदयरोग तज्ञ् डॉ. स्वप्नील चिल्लावार रोग निदान व मार्गदर्शन करणार आहेत.
नोंदणी करिता इच्छुक व्यक्तींनी 9529797636, 9422613983 या नंबरवर नोंदणी करावी. परिसरातील अधिकाधिक नागरिकांनी या निःशुल्क रोग निदान व मार्गदर्शन शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहन चिल्लावार हॉस्पिटल तर्फे करण्यात आले आहे.



टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.