Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: बांबूच्या औद्योगिक व व्यावसायिक महत्त्व याबाबत जनजागृतीची गरज - अन्नपूर्णा धुर्वे (बावनकर)
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
मनोज सोगलकर - विशेष प्रतिनिधी चंद्रपूर - "हिरवं सोनं" म्हणून ओळख असलेला बांबू उद्योग व रोजगाराचे महत्त्वपूर्ण माध्यम बनू शकतो, सोब...

मनोज सोगलकर - विशेष प्रतिनिधी
चंद्रपूर -
"हिरवं सोनं" म्हणून ओळख असलेला बांबू उद्योग व रोजगाराचे महत्त्वपूर्ण माध्यम बनू शकतो, सोबतच पर्यावरणीय दृष्ट्या सुद्धा बांबूचे महत्व अनन्य साधारण आहे. परंतु योग्य जनजागृतीच्या अभावी बांबू या वैशिष्ट्यपूर्ण नैसर्गिक संसाधनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन मर्यादित असल्यामूळे बांबूच्या विविध उपयोगितेचे सोबतच बांबूच्या व्यावसायिक महत्वाबाबत व्यापक जनजागृतीची गरज असल्याचे प्रतिपादन बांबू आर्ट एन्ड नेचर सोसायटी (बांस) च्या सचिव अन्नपूर्णा धुर्वे (बावनकर) यांनी केले.

जागतिक बांबू दिनानिमित्त चिचपल्ली जवळील जाभर्ला येथे बांबू आर्ट एन्ड नेचर सोसायटी (बांस) द्वारा आयोजित बांबू रोपटे लागवड कार्यक्रमात त्या बोलत होत्या. याप्रसंगी बांस चे अध्यक्ष अभय रॉय, बांबू अभ्यासक अनिल दहागांवकर, मंगल वरखडे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. याप्रसंगी अभय रॉय, अनिल दहागांवकर यांनीही समयोचित विचार व्यक्त केले. यावेळी बाल्कोवा या बांबू प्रजातीचे रोपटे लावण्यात आले. तसेच ग्रामस्थांना बांबू रोपटे वितरित करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सपना येमूर्ला, राहुल स्वामी, मंगेश नैताम यांनी परिश्रम घेतले. 









About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top