Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: छत्रपती क्रीडा एकेडमी च्या विद्यार्थ्यांचे सुयश
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
विपरीत परिस्थितीवर मात करून लष्करात आपली जागा पक्की करत केले यश संपादन अनंता गोखरे - तालुका प्रतिनिधी राजुरा - स्थानिक क्रीडा संकुल येथे छत्...

  • विपरीत परिस्थितीवर मात करून लष्करात आपली जागा पक्की करत केले यश संपादन
अनंता गोखरे - तालुका प्रतिनिधी
राजुरा -

स्थानिक क्रीडा संकुल येथे छत्रपती क्रीडा एकेडमी मध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या साहिल सुभाष वाटकर या विद्यार्थ्यांच्या JCI राजुरा रॉयल्स द्वारे गौरव करण्यात आला. साहिल ने विपरीत परिस्थितीवर मात करून लष्करात आपली जागा मिळविली. अभ्यासात हुशार व होतकरू साहिल ला वडील नसल्याने कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी त्याचा खांद्यावर होती. खेळाडू मेहमूद शेख यांनी साहिल ची परिस्थिती लक्षात घेऊन त्याला निःशुल्क मार्गदर्शन व प्रशिक्षण दिले. दोन महिने प्रशिक्षण घेऊन वयाच्या अठराव्या वर्षी त्याची निवड लष्करात झाली. त्याप्रसंगी क्रीडा एकेडमी द्वारे आयोजित निरोप समारंभात साहिल ला JCI राजुरा रॉयल्स च्या अध्यक्षा सुषमा स्वतंत्रकुमार शुक्ला यांचे हस्ते पुस्तक व पुष्पगुछ देऊन गौरव करण्यात आला. यावेळी योगिता भोयर, तोषित एल्लुरे व विद्यार्थी उपस्थित होते. 


About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top