Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: आता विदर्भ वेगळा झालाच पाहिजे !
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
राज्य आंदोलन समिती ने 'वेगळ्या विदर्भ राज्याची त्वरित निर्मिती करा', अश्या मागणीचे निवेदन राष्ट्रपती, पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्...

  • राज्य आंदोलन समिती ने 'वेगळ्या विदर्भ राज्याची त्वरित निर्मिती करा', अश्या मागणीचे निवेदन राष्ट्रपती, पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्र्यांना ई-मेलद्वारे पाठविले.....
  • वाचा सविस्तर.....
आयशा - प्रतिनिधी
नागपूर -

'वेगळ्या विदर्भ राज्याची त्वरित निर्मिती करा', अशी मागणी करणारे निवेदन राष्ट्रपती, पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्र्यांना ई-मेलद्वारे विदर्भ राज्य आंदोलन समितीचे नेते व कार्यकर्त्यांनी पाठविले.

फझल अली कमिशनच्या शिफारशीला ६५ वर्षे झाल्याचे औचित्य साधून समितीच्यावतीने विदर्भ राज्य संकल्प दिवस साजरा करण्यात आला. समितीचे नेते व कार्यकर्त्यांनी विदर्भाच्या कानोकोपऱ्यातून राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना ई-मेल केले. नागपुरात मुख्य संयोजक राम नेवले यांच्या उपस्थितीत मानेवाडा रोडवरील भाग्यलक्ष्मी सभागृहात विदर्भ संकल्प दिवस साजरा करण्यात आला. 'फझल अली कमिशनचा अहवाल लागू करा', 'वेगळा विदर्भ झालाच पाहिजे', 'विदर्भ आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा', अशा घोषणा देत विदर्भवादी ऑनलाइन सक्रिय होते. कमिशनने १० ऑक्टोबर १९५५ रोजी वेगळ्या विदर्भाची शिफारस केली होती. मात्र, या शिफारशींची अंमलबजावणी झाली नाही. इतकेच नव्हे तर, नागपूर कराराचेही पालन झाले नाही. विदर्भ राज्य आंदोलन समितीच्यावतीने सातत्याने सुरू असलेल्या आंदोलनातून नेत्यांना विशेषत: भाजपने दिलेल्या आश्वासनांची आठवण करून देण्यात येत आहे.

नको अनुशेषाचा निधी, नको महाराष्ट्रवाद्यांची गुलामी, आता फक्त 'फझल अली कमिशन'नुसार वेगळे विदर्भ राज्य झाले पाहिजे. नागपूर कराराचा भंग झाला, त्याचीही पूर्तता नको. विदर्भातील तरुणांच्या पळवलेल्या चार लाख नोकऱ्यांची अपेक्षा नाही. मृगजळासारखे विधिमंडळाचे अधिवेशनही नको. २०२३ पूर्वी वेगळे राज्य घेऊ आणि केंद्रातील भाजपला करावेच लागेल, अन्यथा विदर्भातून जावे लागेल, असा निर्धार विदर्भवाद्यांनी केला. यावेळी मुकेश मासुरकर, विष्णू आष्टीकर, सुयोग निलदावार, रेखा निमजे, प्रीती दिडमुठे, सुनीता येरणे, रवींद्र भामोडे, वीणा भोयर, योगिता शेंडे, ज्योती खांडेकर, नितीन अवस्थी, राजेंद्र सतई, प्रशांत जयकुमार, रामभाऊ कावडकर यांची भाषणे झाली. शोभा येवले, नंदलाल टेकाम, गणेश शर्मा, उषा लांबट, अनिल तिडके, विजय मौंदेकर, जया चातुरकर, शुभम पौनिकर, सुरेश निनावे, अभ्युदय कोसे, नरेश निमजे, शुभम खांडेकर, मालती गिरडकर, हरिभाऊ पानबुडे, ऋषी सोनभद्रे, सुनीता शेंद्रे, ललित वाकडे, अश्विनी वानखेडे, संध्या शोभवने उपस्थित होते. 



About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top