- हाथरस हत्याकांडा मध्ये सहभागी आरोपींना फाशी द्या
राजुरा -
उत्तर प्रदेश हाथरस हत्याकांडामध्ये सहभागी असलेल्या आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी यासाठी निषेध दर्शवून कॅडल मार्च काढण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राजुरा शहर, तालुका, युवक, महिला, रोहितदादा पवार विचार मंच तर्फे उत्तर प्रदेश हाथरस येथील पिडीतेवर सामुहिक अत्याचार करून तिची निर्घृण पणे हत्या करण्यात आली. हि घटना अतिशय दुर्दैवी आणि संतापजनक असून हत्याकांडा मध्ये सहभागी असलेल्या आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी यासाठी निषेध दर्शविण्यात आला व कँडल मार्च काढण्यात आला. पीडित मृतकाच्या आत्म्यास शांती लाभो याकरिता दोन मिनिटांच्या मौन पाळण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस चे तालुकाध्यक्ष संतोष देरकर, तालुका युवक अध्यक्ष आसिफ सय्यद, राजुरा शहराध्यक्ष व युवा नेते आशिष यमनुरवार, युवक शहराध्यक्ष स्वप्निल बाजुजवार, रोहित दादा पवार मंच शहराध्यक्ष सुजित कावळे, शहर उपाध्यक्ष राजु ददगाळ, शहर महासचिव अंकुश भोंगळे, अमोल ताठे व शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.