Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यातील दारूबंदी उठवण्यासाठी मंत्रालयात हालचालींना वेग
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
दारूबंदी उठवण्यासाठी राज्य सरकारकडे २ लाख ४० हजार अर्ज निवेदने आले दारूबंदी उठवू नये म्हणून फक्त २५ हजार निवेदने आले विशेष प्रतिनिधी मुंबई -...

  • दारूबंदी उठवण्यासाठी राज्य सरकारकडे २ लाख ४० हजार अर्ज निवेदने आले
  • दारूबंदी उठवू नये म्हणून फक्त २५ हजार निवेदने आले
विशेष प्रतिनिधी
मुंबई -
दारूबंदी केल्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या पाच वर्षात अवैध दारूची विक्री वाढली होती. बनावट दारू प्यायल्याने अनेकांचा मृत्यूही झाला असून गुन्हेगारीतही वाढ झाली आहे. त्यामुळे चंद्रपूर-गडचिरोलीतील दारूबंदी उठवण्यासाठी वडेट्टीवार यांनी उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे-पाटील यांना २७ ऑगस्टला पत्र लिहून दारूबंदी उठवण्याची मागणी केली होती. त्यामुळे आता या दोन्ही जिल्ह्याची दारूबंदी उठवण्यासाठी स्थापन करण्यात येणारी समिती काय निर्णय देते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 

गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठवण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून हालचाली सुरू होत्या. 
दोन्ही जिल्ह्यातील दारूबंदी उठवण्यासाठी राज्य सरकारकडे २ लाख ४० हजार अर्ज निवेदने आले होते. तर दारूबंदी उठवू नये म्हणून फक्त २५ हजार निवेदने आले होते. त्यामुळे मंत्रालयात दारूबंदी उठवण्यासाठीच्या हालचालींना वेग आला आहे. काल मंत्रालयात एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली असून दोन्ही जिल्ह्यातील दारूबंदी उठवण्याबाबत विचार करण्यात आला असल्याचं मदत आणि पूनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं. दोन्ही जिल्ह्यातील दारूबंदी उठवण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात येणार असून ही समिती दीड महिन्यात कॅबिनेटसमोर अहवाल सादर करणार असल्याचंही वडेट्टीवार यांनी सांगितलं. 








About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top