Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: विद्युत विभागाची कामे तातडीने पूर्ण करा
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आमदार सुभाष धोटे यांच्या अधिकाऱ्यांना सुचना अनंता गोखरे - तालुका - प्रतिनिधी राजुरा - शहरी व ग्रामीण भागातील वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा...

  • आमदार सुभाष धोटे यांच्या अधिकाऱ्यांना सुचना
अनंता गोखरे - तालुका - प्रतिनिधी
राजुरा -

शहरी व ग्रामीण भागातील वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा व वीज ग्राहक शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन विश्रामगृह राजुरा येथे वीज वितरण कंपनी चंद्रपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता यांच्याशी बैठक आयोजित करून राजुरा मतदार संघातील विद्युत विभागाची प्रलंबित व दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण करून जनतेची होत असलेली गैरसोय दूर करावी अशा सूचना राजुराचे आमदार सुभाष धोटे यांनी वीज वितरण विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्यात. 

राजुरा शहर व ग्रामीण भागातील वीज वारंवार खंडित होण्यामुळे जनतेची गैरसोय होत आहे. अखंडित वीज पुरवठा करून जनतेची गैरसोय दूर करण्याच्या दृष्टीने वीज वितरण व्यवस्था दुरुस्त करणे अतिशय गरजेचे आहे. कृषी पंपाच्या वीज जोडणीसाठी शेतकरी सोलर योजनेकरीता आकर्षित नसल्याने जवळपास असलेल्या रोहित्रावरून नवीन कृषी पंपाचे वीज पुरवठा जोडण्यात यावे. अहेरी 33 केव्ही उपकेंद्र तातडीने सुरु करून पाचगाव, पांढरपौनी परिसरातील वीज जोडणी या उपकेंद्रावर जोडण्यात यावी. ३१ मार्च २०१८ पर्यंतची कृषी पंपाची वीज जोडणी पूर्ण करून १ एप्रिल २०१८ नंतरची सुध्दा वीज जोडणी तातडीने पूर्ण करण्यात यावी. बिरसा मुंडा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन योजने अंतर्गत च्या लाभार्थ्यांना तातडीने वीज जोडणीचे डिमांड देण्यात यावे. शहरातील व ग्रामीण भागातील सिंगल फेजचे थ्री फेज करण्यात यावे. रोहीत्रांची दुरुस्ती करण्यात यावी. राजुरा व विरूर जंगल व्याप्त परिसरात वाघाची दहशत असल्याने शेतकऱ्यांना दिवसाचा विद्युत पुरवठा देण्यात यावा. राजुरा शहरी विभागाचे कार्यालय बामनवाडा येथून राजुरा येथे स्थलांतरीत करावे. शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचे वीज पुरवठा तातडीने पूर्ण करण्यात यावे. अशा सूचना आमदार सुभाष धोटे यांनी वीज वितरण विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. 

या प्रसंगी राजुराचे नगराध्यक्ष अरुण धोटे, वीज वितरण विभागाचे मुख्य अभियंता सुनील देशपांडे, अधीक्षक अभियंता संध्या चिवंडे, कार्यकारी अभियंता महेश तेलंग, वीज वितरण विभागाचे सहाय्यक कार्यकारी अभियंता कातकर, लोहे, इंदुरीकर, उपनगराध्यक्ष सुनील देशपांडे, सभापती मुमताज जावेद, कोरपना सभापती सौ. रुपाली तोडासे, राजुरा उपसभापती मंगेश गुरुनुले, नगर सेवक हरजित सिंग, गजानन भटारकर, आनंद दासरी, प. स. सदस्य तुकाराम मानुसमारे, रामदास पुसाम, माजी जिल्हा परिषद सदस्य उत्तम पेचे, शिताराम कोडापे, माजी सभापती, सदस्य स्याम रणदिवे, माजी उपसभापती, सदस्य संभाजी कोवे, बाजार समिती संचालक अविनाश जेणेकर, सुरेश मालेकर, भाऊराव चौव्हाण, साईनाथ बतकमवार, नंदकिशोर वाढई, रंजन लांडे, घनश्याम नांदेकर, संजय तोडासे, शैलेश लोखंडे, धनराज चिंचोलकर, इर्शाद शेख, सुभाष राऊत इत्यादी उपस्थित होते.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top