Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: तीन बाधितांचा मृत्यू
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
24 तासात 188 बाधित आले पुढे उपचार घेणाऱ्या बाधितांची संख्या 3246 जिल्ह्यातील बाधितांची एकूण संख्या 11306 चंद्रपूर जिल्ह्यात आतापर्यंत 7883 क...

  • 24 तासात 188 बाधित आले पुढे
  • उपचार घेणाऱ्या बाधितांची संख्या 3246
  • जिल्ह्यातील बाधितांची एकूण संख्या 11306
  • चंद्रपूर जिल्ह्यात आतापर्यंत 7883 कोरोना मुक्त
श्रावण कुमार - प्रतिनिधी
चंद्रपुर -

चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या 24 तासात 188 बाधित पुढे आलेले असून एकूण बाधितांची संख्या आता 11 हजार 306 वर पोहोचली आहे. आतापर्यंत 7 हजार 883 कोरोना बाधित उपचाराअंती बरे झालेले असून त्यांना सुटी देण्यात आली आहे. सध्या उपचार घेणाऱ्या बाधितांची संख्या 3 हजार 246 आहे.

आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार, 24 तासात तीन बाधितांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या बाधितांमध्ये, खुटाळा, चंद्रपुर येथील 63 वर्षीय पुरुष बाधिताचा समावेश आहे. या बाधिताला 3 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते.

दुसरा मृत्यू घुटकाळा, चंद्रपुर येथील 55 वर्षीय पुरुष बाधिताचा झाला आहे. या बाधिताला 2 ऑक्टोबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते.

तर, तिसरा मृत्यू लक्ष्मी नगर, चंद्रपुर येथील  40 वर्षीय पुरुष बाधिताचा झाला आहे. या बाधिताला 1 ऑक्टोबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते. पहिल्या बाधिताला कोरोनासह श्वसनाचा आजार होता. दुसऱ्या व तिसऱ्या बाधिताला कोरोनासह उच्चरक्तदाब, न्युमोनियाचा आजार होता. तीनही बाधितांचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपुर येथे मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 177 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 168, तेलंगाणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली तीन, यवतमाळ तीन आणि भंडारा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

जिल्ह्यात 24 तासात पुढे आलेल्या बाधितांमध्ये चंद्रपूर शहर व परिसरातील 76, पोंभूर्णा तालुक्यातील एक, बल्लारपूर तालुक्यातील 17, चिमूर तालुक्यातील चार, मुल तालुक्यातील आठ, गोंडपिपरी तालुक्यातील एक, कोरपना तालुक्यातील 10, ब्रह्मपुरी तालुक्यातील 11, नागभीड तालुक्यातील 26,  वरोरा तालुक्यातील 10, भद्रावती तालुक्यातील 9, सावली तालुक्यातील एक,  राजुरा तालुक्यातील आठ, गडचिरोली, गोंदिया व तेलंगणा येथील प्रत्येकी दोन असे एकूण 188 बाधित पुढे आले आहे.

या ठिकाणी आढळले शहर व परिसरात बाधित:
चंद्रपूर शहरातील व परिसरातील जलनगर वार्ड, ऊर्जानगर, बागला चौक परिसर, सिस्टर कॉलनी परिसर, रामनगर, मित्र नगर, बाबुपेठ, विठ्ठल मंदिर वार्ड, वाघोबा चौक तुकूम, दुर्गापुर , सिद्धार्थ नगर भागातून बाधित पुढे आले आहे.

ग्रामीण भागात या ठिकाणी आढळले बाधित:
बल्लारपूर तालुक्यातील आंबेडकर वार्ड, फुलसिंग नाईक झाकीर हुसेन वार्ड, महाराणा प्रताप वार्ड, टिळक वार्ड, बालाजी वार्ड, परिसरातून पॉझिटिव्ह ठरले आहे. राजुरा तालुक्यातील सास्ती, जवाहर नगर, सोनिया गांधी चौक परिसर, रामनगर कॉलनी परिसर, भागातून बाधित पुढे आले आहे.

वरोरा तालुक्यातील  माढेळी, मालवीय वार्ड, आंबेडकर चौक परिसर, कॉलरी वार्ड,परिसरातून बाधित ठरले आहे. ब्रह्मपुरी तालुक्यातील गाडगेबाबा नगर, विद्यानगर, कुर्झा, चिखलगाव, बाजार चौक परिसर, आक्सापुर, शारदा कॉलनी परिसरातून पॉझिटिव्ह ठरले आहे.

भद्रावती तालुक्यातील नवीन सुमठाणा, गुरूनगर, कुणबी सोसायटी परिसरातून बाधित पुढे आले आहे.सावली तालुक्यातील अंतरगाव भागातून बाधित ठरले आहे.

नागभीड तालुक्यातील नवखेडा, वाढोणा, शिंदे लेआउट परिसर, गिरगाव, डोंगरगाव, सावरगाव, नवखडा, किरमिटी मेंढा परिसरातून पॉझिटिव्ह ठरले आहे. चिमूर तालुक्यातील बंदर खडसंगी,भागातून बाधित ठरले आहे. कोरपना तालुक्यातील आवारपूर, लाल बहादुर स्कूल परिसर, कन्हाळगाव भागातून पॉझिटिव्ह ठरले आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top