- रांची येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आला निर्णय
रांची -
रांची येथे कोल इंडिया लिमिटेडने बोलावलेल्या संयुक्त बैठकीत दुर्गापूजनाच्या निमित्ताने कोळसा कामगारांना वार्षिक पीएलआर बोनस म्हणून 68500 रुपये वार्षिक बोनस देण्या संबंधी निर्णय घेण्यात आला. सदर रक्कम सर्व कर्मचार्यांच्या खात्यावर 22 ऑक्टोबरपर्यंत पाठविण्यासाठी निर्णय घेण्यात आला. या बैठकीत कामगार संघटनांचे प्रतिनिधी आणि सीआयएलचे संचालक कार्मिक, एनसीएलचे सीएमडी प्रभातकुमार सिन्हा आणि अन्य सहाय्यक कंपन्यांसह कोल इंडिया व्यवस्थापनाचे वरिष्ठ प्रतिनिधी उपस्थित होते. कामगार संघटनांचे प्रतिनिधीनी बोनस विषयी मागणी रेटुल धरली अखेर व्यवस्थापनाने कर्मचार्यांना वार्षिक बोनस 68 हजार 500 देण्याचे मान्य केले.
संघटनेच्या प्रतिनिधींमध्ये भारतीय मजदूर संघाचे डॉ. बीके राय, अखिल भारतीय खाणी मजदूर युनियनचे अध्यक्ष नरेंद्रसिंग, आयटकचे रामेंद्र कुमार, सिटूचे डीडी रामानंदन आणि एचएमएस नाथूलाल पांडे या बैठकीस उपस्थित होते. उल्लेखनीय आहे की कोविड 19 च्या प्रभावामुळे कोलकाता किंवा देशातील मोठ्या शहरांमध्ये सहसा आयोजित केली जाणारी ही बैठक रांची येथे आयोजित करण्यात आली होती.


टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.