- तर गडचांदुर शहर अध्यक्ष पदी इमरान पाशा शेख यांची नियुक्ती
कोरपना -
चंद्रपूर जिल्ह्यातील किसान युवा क्रांती संघटना कोरपना तालुका अध्यक्ष पदी गडचांदुर शहरातील सामाजिक कार्यकर्ते श्रीपाद संतोष भारती यांची नियुक्ती करण्यात आली. शहरातील राजकिय तथा सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर राहणारे श्रीपाद भारती असतात त्यांच्या मागील कार्याला पाहूनच, किसान युवा क्रांती संघटनेचे अध्यक्ष-संस्थापक यशवंत गोसावी यांनी भारती यांना तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी कोरपना तालुका अध्यक्ष पदी नियुक्ती केली व शेतकऱ्यांच्या व समाजाच्या विकासासाठी कामे कराल अशी आशा व्यक्त केली. लवकरच कोरपना व राजुरा तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच गडचांदुर शहर अध्यक्ष पदी इमरान पाशा शेख यांची नियुक्ती करण्यात आली आहे.







टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.